कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Sangli : नगरपालिका निवडणूक तोडीस तोड लढवू : आ. जयंत पाटील

01:47 PM Oct 21, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

          इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा बूथ अध्यक्ष-कार्यकर्ता संवाद मेळावा

Advertisement

इस्लामपूर : नगरपालिकेची निवडणूक तोडीस तोड लढवू चिंता करू नका. या शहरातील जनतेला गेल्या ८ वर्षात जो अनुभव आला, त्यावरून शहरातील जनता निश्चितपणे आपणास पसंती देतील. तळागाळात जाऊन काम करणारा कार्यकर्ता हाच आपल्या पक्षाचा आधारस्तंभ असल्याचे मत माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

Advertisement

येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित बूथ अध्यक्ष व कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शहरातील उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या प्रथम पाच बूथचा आ.पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रा शामराव पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगराध्यक्ष पै. भगवान पाटील, खंडेराव जाधव, मुनीर पटवेकर, अरुणादेवी पाटील, सुभाषराव सुर्यवंशी, महिला शहराध्यक्षा पुष्पलता खरात, युवक शहराध्यक्ष दिग्विजय पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

आ.पाटील म्हणाले, आपण सर्वांनी विधान सभेला मोलाचे योगदान दिले आहे. लाडक्या बहिणी योजनेने आपले मताधिक्य कमी झाले आहे. या शहरात गेल्या ७-८ वर्षात नवीन एकही काम झाले नाही. उलट जे काम चालू होते, ते बंद पाडण्याचे काम करण्यात आले आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे काम गतीने चालू आहे. आपण सर्वांनी मतदार याद्यावर लक्ष ठेवा. यावेळी आपण प्रभावी युवा वक्त्यांना संधी देऊ, ते आपण शहरात केलेले काम, आपली भूमिका लोकांच्यापर्यंत जाऊन मांडतील.

यावेळी शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, पै. भगवान पाटील, अरुणादेवी पाटील, मुनीर पटवेकर, खंडेराव जाधव यांचीही भाषणे प्रारंभी महिला शहराध्यक्षा खरात यांनी स्वागत केले. झाली. पुष्पलता याप्रसंगी सुभाषराव सूर्यवंशी, शंकरराव चव्हाण, विलास ताटे, संदीप पाटील, रोझा किणीकर, रुपाली जाधव, शुभांगी शेळके, कोमल बनसोडे, संजय पाटील, शैलेश पाटील, अरुण कांबळे, शंकरराव महापुरे, अभिजित कुर्लेकर, प्रियांका साळुंखे यांच्यासह पदाधिकारी, माजी नगरसेवक, बूथ अध्यक्ष व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#BoothMeeting#ElectionPreparation#Islamapur#JayantPatil#ncp#PoliticalWorkers#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article