महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आपुल्या आपुल्या कर्मी दक्ष तो मोक्ष मेळवी

06:18 AM Aug 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय दुसरा

Advertisement

गुरुजन नेहमीच सदुपदेश करत असतात. त्याचा उपयोग करून घ्यायचा की आपली आणखीन वाट लावून घ्यायची हे मनुष्य ठरवू शकतो. प्रत्येक मनुष्याचा स्वभाव त्याच्या पूर्वकर्मानुसार ठरत असतो. तसेच त्याच्या जीवनातले प्रसंगही त्याच्या प्रारब्धानुसार घडत असतात. त्या त्या प्रसंगात ईश्वराने दिलेल्या बुद्धीचा उपयोग करून तो जर गुरुजनांच्या उपदेशानुसार वागला तर त्याचा उध्दार होतो अन्यथा चुकीचं वागल्याने काम आणि क्रोध त्याचा सर्वनाश घडवून आणतात. हे चुकीचं वागणं कोणतं ते बाप्पा पुढील श्लोकात सांगतायत.

Advertisement

शस्तो गुणो निजो धर्म सांगादन्यस्य धर्मत ।

निजे तस्मिन्मृति श्रेयो परत्र भयद पर ।।35।

अर्थ-सांगोपांग आचरण केलेल्या दुसऱ्याच्या धर्माहून स्वत:चा धर्म गुणहीन असला तरी अधिक स्तुतीस पात्र आहे. स्वत:च्या धर्मामध्ये मरण श्रेयस्कर आहे. परधर्म परलोकी भय देणारा आहे. विवरण-येथे धर्म म्हणजे कर्तव्य असा अर्थ आहे. ईश्वराने प्रत्येक मनुष्याला त्याचे कर्तव्य ठरवून दिले आहे व त्यानुसार कामही नेमून दिले आहे. ते प्रामाणिकपणे करून त्याच्या फळाची अपेक्षा न करता ते ईश्वराला अर्पण करणे असा परिपाठ जो ठेवतो तो अंती ईश्वराला जाऊन मिळतो. पण बरेच लोक हा धडा लक्षात न घेता स्वत:च्या बुद्धीने काही तरी वेगळेच करायला जातात. बाप्पा त्याला परधर्माचरण असं म्हणतात. परधर्म आचरणे म्हणजे मिळालेल्या कामापेक्षा दुसरंच काहीतरी करणे. हे चुकीचे आहे कारण नेमून दिलेलं काम टाळणं अपेक्षित नसल्याने ते परलोकी अडचणीत आणतं. स्वत:चं काम दोषपूर्ण वाटत असलं, आवडत नसलं तरी करावं कारण ते तुमचं उद्दिष्ट साध्य करून देणारं असतं. गीतेच्या अठराव्या अध्यायात याची ग्वाही भगवंतांनीही दिली आहे ती याप्रमाणे, आपुल्या आपुल्या कर्मी दक्ष तो मोक्ष मेळवी। ऐक लाभे कसा मोक्ष स्व-कर्मी लक्ष लावुनी।।18.45।। जो प्रेरी भूत-मात्रास ज्याचा विस्तार विश्व हे । स्व-कर्म-कुसुमी त्यास पूजिता मोक्ष लाभतो।।18.46।।  उणा हि अपुला धर्म पर-धर्माहुनी बरा । स्वभावे नेमिले कर्म करी तो दोष जाळितो ।।18.47।। सहज-प्राप्त ते कर्म न सोडावे सदोष हि । दोष सर्व चि कर्मांत राहे अग्नींत धूर तो ।।18.48।। हे सर्व ऐकून पुढील श्लोकात राजाने बाप्पांना प्रश्न विचारला, बाप्पा तुम्ही सांगताय त्यातील शब्द अन् शब्द मला पटला पण मग असं काय बलवत्तर कारण आहे की, ज्यामुळे मनुष्य पाप करतो आणि ते करायला त्याला कोण प्रेरणा देतो d?

पुमान्यत्कुरुते पापं स हि केन नियुज्यते ।

अकाक्षन्नपि हेरम्ब प्रेरित प्रबलादिव ।। 36 ।।

अर्थ-हे हेरंबा, इच्छा नसतानाही कोणत्या बलवत्तर कारणाने जणूं प्रेरित होत पुरुष जे पाप करतो, ते करण्याची कोण योजना करतो? विवरण-असा प्रश्न मनात येणं साहजिक आहे. सद्गुरूंचा उपदेशानुसार आपण सदाचरणाने वागलो नाही, निरपेक्षतेने कर्म केले नाही, वाट्याला आलेले कर्म करायचे सोडून स्वत:च्या डोक्याने दुसरेच काहीतरी करत बसलो तर आपल्याला मोक्ष तर मिळणार नाहीच उलट आपण जन्ममरणाच्या चक्रात अडकून पुन:पुन्हा त्यातून फिरत राहू हे सर्व लक्षात आलेल्या माणसाला पाप करायची इच्छाच होऊ नये पण प्रत्यक्षात मात्र तसं घडताना दिसून येत नाही. मनुष्य सद्गुरूंचा उपदेश ऐकून घेतो. पोथ्यापुरणातली संतांची वचनं त्याला तोंडपाठ असतात पण जीवनात तो अनेक पापं राजरोसपणे अगदी दिवसाढवळ्या करत असतो. विशेष म्हणजे त्याला त्यात काही गैर न वाटता तो म्हणतो, अहो हा व्यवहार आहे. इथं असंच वागावं लागतं. कोर्टात लोक गीतेवर हात ठेवून शप्पथ घेतात आणि उघड उघड खोटं बोलतात तसंच आहे हे. थोडक्यात सद्गुरूंचा उपदेश आणि माणसाचं वागणं यांचा कुठंच मेळ लागत नाही. असं का होतं?

क्रमश:

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article