निलेश राणेंसारखा अभ्यासू आमदार हवा - वर्षा कुडाळकर
कुडाळ / प्रतिनिधी
कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना या विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी महिला वर्ग, युवा वर्ग मोठ्या संख्येने रिंगणात उतरलेले आहेत. मतदानाला अवघे नऊ दिवस शिल्लक असताना सर्व ठिकाणी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद महायुतीच्या उमेदवाराला लाभत आहे. निलेश राणे सारखा अभ्यासू आमदार हवा असे शिवसेना जिल्हा महिला आघाडी प्रमुख वर्षा कुडाळकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे .
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत निलेश राणे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करून हाती धनुष्यबाण घेतला त्यांच्या पक्षप्रवेशामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे. त्याचबरोबर त्यांना मिळालेली महायुतीची उमेदवारी हा योग म्हणजे दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल . गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत त्यांनी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला. महायुती सरकारच्या माध्यमातून त्यांनी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यावधी निधी आणून तो प्रत्यक्षात साकारला विकासाच्या नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात अमलात आणल्या. आज त्यांच्या रूपात शिवसेनेच्या माध्यमातून महायुतीला मिळालेली उमेदवारी ही आम्हा सर्व शिवसैनिका मध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण करणारी आहे असे श्रीमती कुडाळकर म्हणाल्याआज त्यांचा प्रचार करताना कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघांमध्ये युवकांचे नेतृत्व करणारं सर्वसामान्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणारे व्यक्तिमत्त्व म्हणून निलेश राणे यांच्याकडे पाहिले जात आहे या मतदारसंघात त्यांची प्रचारात आघाडी असून महिलावर्ग युवावर्ग कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या माध्यमातून सर्वसामान्याचे प्रश्न सोडवतानाच लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी आणलेली योजना सिंधुदुर्गातच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात फलश्रुतीदायक ठरणारी आहे कुडाळ मालवणचा गेली दहा वर्षे रखडलेला विकास गतिमान करण्यासाठी आज निलेश राणे सारख्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाची गरज आहे हिच गरज आम्ही करत असणाऱ्या प्रचाराच्या माध्यमातून तमाम मतदार बंधू-भगिनींना ओळखलेली आहे आणि म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत या मतदारसंघातून निलेश राणे दैदिप्यमान यश संपादन करून विकासाची गतिमान करणारे आमदार म्हणून विधानसभेत जातील आज प्रचार करताना विकासाचा मुद्दा सोबत घेतानाच निलेश राणे सारखे उमेदवार आहेत ,महायुती त्यांना मोठ्या प्रमाणात स्वीकारत आहे हाच आमचा विजय आहे असे शिवसेना महिला आघाडी प्रमुख वर्षा कुडाळकर यांनी म्हटले आहे.