For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

त्या जमिनीची मालकीण आपणच

12:43 PM Jul 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
त्या जमिनीची मालकीण आपणच
Advertisement

संशयित पूजा शर्मा हिचा न्यायालयात दावा : आगरवाडेकरने अतिक्रमण केल्याचा आरोप

Advertisement

पणजी : आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबियांचे घर पाडण्याचा आरोप असलेली मुख्य  संशयित आरोपी पूजा शर्मा हिच्या वकिलाने काल शुक्रवारी न्यायालयात नवा पवित्रा घेताना पूजा शर्मा निर्दोष असून त्या जागेच्या पूजा शर्माच त्या जागेच्या मालक असल्याचा दावा केला. आगरवाडेकर यांनीच आपल्या जागेत अतिक्रमण केल्याचा आरोप केल्याने खटल्याला नवे वळण लागले आहे. प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायालयाने शर्मा हिला अंतरिम दिलासा दिला नाही, आज शनिवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.आल्तिनो-पणजी येथील प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायालयात पूजा शर्मा हिला अटकपूर्व जामीन देण्यास विरोध करून क्राईम ब्रांचने सादर केलेल्या उत्तराला शुक्रवारी प्रत्युत्तर देण्यासाठी शर्मा हिचे वकील सुरेंद्र देसाई यांनी युक्तिवाद सुऊ केला. क्राईम ब्रांचच्या वकिलाने न्यायालयात सांगितले की पूजा शर्मा हिला याआधी हणजूण पोलिसांकडून एक आणि क्राईम ब्रांचने एक असे दोन समन्स पाठवले होते.

त्यानंतर काल शुक्रवारी तिसरा समन्स पाठवला. फौजदारी कायद्याच्या कलम- 41 (अ) खाली तब्बल तीन समन्सना पूजा शर्मा हजर राहिली नसल्याने तिला अटकपूर्व जामीन देऊ नये, अशी न्यायालयाला विनंती केली. पोलिसांच्या विनंतीवर पूजा शर्माचे वकील देसाई यांनी सुमारे दीड तास पूजा शर्मा हिची बाजू मांडली. ते म्हणाले, पहिले समन्स मुबंईत पाठवले त्यावेळी शर्मा हिने आपण दुसऱ्या दिवशी गोव्यात पोचू शकत नसल्याचे हणजूण पोलिसांना कळविले होते. त्यानंतर हे तपासकाम क्राईम ब्रांचकडे सुपूर्द केले असता त्यांनी दुसरे समन्स पाठविले. त्यावेळे शर्मा हिमाचल प्रदेशमध्ये असल्याने तिने जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात येऊन तपासकामात मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर क्राईम ब्रांचने शुक्रवारी जर समन्स पाठवले असेल तर ते अजूनही आपल्या अशिलाला मिळाले नसल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.

Advertisement

 घर पाडण्याशी कोणताही संबंध नाही

अॅड. देसाई यांनी पोलीस तपासकामातील अनेक चुका दाखवताना पोलीस राजकीय दडपणाखाली काम करत असल्याचा आरोप केला. आपल्या  अशिलावर केलेले सर्व आरोप खोटे असून पूजा शर्मा यांचा आगरवाडेकर यांचे घर पाडण्याप्रकरणाशी कोणताही संबंध नाही.

 पूजा शर्मा ही सध्याची जमिनमालक 

पूजा शर्मा या जागेची आताची मालकीण असून कोणीतरी मुद्दामहून राजकीय डावपेच खेळण्याचा प्रयत्न केला आहे. सदरची 600 चौमी.ची जागा शर्मा हिने जमिनीचे तत्कालीन मालक पिंटो दांपत्याकडुन सुमारे ऊ.  1. 68 कोटी रुपये फेडून खरेदी केली आहे. यासाठी खरेदी करार बार्देश तालुक्याच्या निबंधकाकडे नोंद करण्यात आला असल्याचे देसाई यांनी नमूद केले. आपल्या हक्काच्या जागेत कोणीही बेकायदेशीरपणे अतिक्रमण करत असेल तर कायद्याने त्याच्यावर जबरदस्ती करून हाकलून लावण्याचा आपल्याला हक्क आहे.  तो हक्क अजूनही आपण बजावला नसल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.

 पूजा शर्माने दिलेल्या तक्रारीवर पोलिसांची चुप्पी का?

आसगाव  येथील आपल्या जागेत प्रदीप आगरवाडेकर कुटुंबानेच अतिक्रमण करून घुसखोरी केली असल्याचा दावा पूजा शर्मा हिच्या वकिलाने केला. हॉलंड येथील दोघा नागरिकांनी कायद्याचे उल्लंधन करून प्रदीप आगरवडेकर याला 2000 साली ‘पॉवर ऑफ अटर्नी’ देऊन आपल्या जागेत राहण्यास सांगितले होते. आगरवाडेकर याने बेकायदेशीरपणे हाऊस टॅक्स, वीज आणि पाणी बिलावर आपले नाव नोंदवून घेतले. आगरवाडेकर हे मूळचे शिवोलीचे असून तिथे त्यांची मतदार म्हणून नोंदणी आहे. या बेकायदेशीर अतिक्रमणविऊद्ध शर्मा हिने हणजूण पोलिसात 23 मार्च 2024 रोजी लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारींवर आजपर्यंत पोलिसांनी काहीही कारवाई न करता चुप्पी का साधली आहे, असा सवाल अॅड. देसाई यांनी उपस्थित केला.

Advertisement
Tags :

.