महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आम्ही जनतेचे सेवक; जनतेला त्रास देण्याचा अधिकार नाही

10:55 AM Oct 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आमदार राजू सेठ यांनी मनपाच्या बैठकीत अधिकाऱ्यांना झापले

Advertisement

बेळगाव : आम्ही जनतेचे सेवक आहोत. जनतेची कामे केली पाहिजेत. जनतेच्या सोयीची कामे करत असताना दुसऱ्यावर अन्याय होऊ नये, हेदेखील पाहिले पाहिजे. अन्यथा काही जणांना त्यापासून नाहक त्रास होतो. त्याचे परिणाम भविष्यात संबंधित संस्थेला होत असतात. याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे, असे परखड मत आमदार राजू सेठ यांनी व्यक्त केले.

Advertisement

महानगरपालिकेची सर्वसाधारण बैठक झाली. या बैठकीमध्ये रस्त्याबाबत चर्चा झाली. त्यावेळी महापौर सविता कांबळे यांच्यासमोर आमदार राजू सेठ यांनी जनतेची कैफियत मांडली. रस्त्यासाठी जागा घेतलीच पाहिजे, त्याला आपला विरोध नाही. मात्र, कायद्याच्या चौकटीत जागा घेतली पाहिजे. गैरप्रकाराने किंवा कायदा डावलून कोणतेही काम करायचे नाही. संबंधितांना नोटीस दिली पाहिजे. त्यानंतर त्यांच्याशी चर्चा करणे महत्त्वाचे आहे. ही प्रक्रिया न झाल्यामुळेच शहापूर येथील त्या जागेबरोबरच शहरातील इतर जागांचा फटका महानगरपालिकेला बसल्याचा आरोप सेठ यांनी केला.

याबाबत ते पुढे म्हणाले, जागा घेताना जे स्मार्ट सिटीचे अधिकारी होते, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. एकूणच रस्त्याला घेतलेल्या जागेवरून या बैठकीमध्ये आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. मात्र, राजू सेठ यांनी जनतेची बाजू भक्कमपणे मांडत होणारे गैरप्रकार थांबवावेत, हे सभागृहात सांगितले. यावेळी राजू सेठ यांचा पारा चांगलाच चढला होता. आम्ही जनतेचे सेवक आहोत. जनतेच्या म्हणण्यानुसार काम केलेच पाहिजे. पण हे काम करताना कायद्याच्या चौकटीतच झाले पाहिजे. एखाद्या व्यक्तीचे चांगले करण्यासाठी दुसऱ्याचा खून करणे योग्य नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

गुरुवारी महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये बैठक पार पडली. यावेळी रस्त्याला घेतलेल्या जागेवरून बराच गोंधळ उडाला. प्रारंभी टाटा समुहाचे प्रमुख रतन टाटा आणि महानगरपालिकेचे तत्कालिन कौन्सिल सेक्रेटरी एच. डी. पिरजादे यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर मागील बैठकीमध्ये झालेल्या ठरावांना मंजुरी देण्यात आली. या बैठकीला सत्ताधारी गटनेते नगरसेवक गिरीश धोंगडी, विरोधी गटनेते नगरसेवक मुजम्मील डोणी, नगरसेवक रवी साळुंखे, नगरसेवक शाहीदखान पठाण, रमेश सोंटक्की, दिनेश नाशीपुडी, हणमंत कोंगाली यांच्यासह इतर नगरसेवक उपस्थित होते.

...अन् आमदारांचा पारा चढला

महानगरपालिकेतील नगरसेवकांकडून महापौर असो किंवा सभागृहाचा अवमान नेहमीच केला जातो. याबाबत अनेकवेळा नगरसेवकांना सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. गुरुवारी झालेल्या बैठकीमध्येही एका नगरसेवकाने अचानकपणे उठून आमदार राजू सेठ यांच्याकडे बोट करून उत्तर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी आमदार राजू सेठ यांनी त्या नगरसेवकाला चांगलेच झापले. बोट करून काय बोलतोस? थोडासा सभागृहाचा मान राखा, असे त्यांनी त्याला सुनावले. आमदार राजू सेठ यांनी हिंदीमध्येच प्रश्न विचारले. याचबरोबर आपण कसे वागले पाहिजे, जनतेसाठी काम कसे केले पाहिजे, हे सांगितले. याचवेळी एका नगरसेवकाने कन्नडमधून का बोलत नाहीत? असे विचारले. त्यावर आमदार राजू सेठ यांनी मला कन्नड समजतेही, बोलतोही आणि लिहितोही. मात्र, अधिक नगरसेवक हे मराठी आहेत. त्यामुळेच मी हिंदीतून बोलत आहे. तुम्ही मला उपदेश करू नका, असा टोला त्या नगरसेवकाला लगावला. एकूणच आमदार राजू सेठ यांनी सत्ताधारी गटातील नगरसेवकांना चांगलेच झापले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article