हल्याळ, दांडेली, जोयडा तालुक्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू
वार्ताहर /हल्याळ
हल्याळ, दांडेली व जोयडा या तिन्ही तालुक्यात येणाऱ्या खेडेगावात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. तिन्ही तालुका प्रशासनाकडून विहिरीचे व बोरवेलचे पाणी टँकरद्वारे प्रत्येक गावात पोचविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. हल्याळ तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या पाण्याची कमतरता जाणऊ लागल्याने शेतकरी वर्ग फारच हवालदील झाला आहे. पाण्याची कमतरता ज्या ज्या गावात आहे. त्याकडे हल्याळ तालुका प्रशासन गंभीरतेने पहात आहे. त्या गावांना सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. सध्या हल्याळ तालुक्यात 21 ग्रा. पं. पैकी 17 ग्रा. पं. मध्ये येणाऱ्या 51 गावांमध्ये पाण्याची कमतरता निर्माण झाली आहे. असे हल्याळ तालुका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला तीन दिवसापूर्वी अहवाल सादर केला आहे. ज्या गावात पाणी नाही आशा गावांना टँकद्वारे शिवाय ज्या ज्या गावातील शिवारात विहिरी व कूपनलिका आहेत. त्या शेतकऱ्यांच्या मालकांबरोबर तालुका प्रशासन मंथली बेसेसवर भाडे करार करून त्या त्या गावातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सुमारे 50 हून अधिक शेतकरी मालकांबरोबर करार झाला आहे. या करारामुळे गावकऱ्यांना पाणी व्यवस्थित पोहोचवत आहेत.
जोयडा तालुक्यातील 4 ग्रा. पं. मधील 10 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा
जोयडा तालुका हा सर्वात जास्त पर्जन्यमान होणार तालुका आहे. येथे दरवर्षी 3500 ते 8000 मिली मीटर पाऊस पडतो. पण, मागील पावसाळ्यात पावसाचे प्रमाण थोडे कमी झाले आहे. जोयडा तालुक्यात 16 ग्राम पंचायत पैकी 4 ग्रा. पं. व्याप्तीमध्ये येणाऱ्या 10 खेड्यामध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. तसा रिपोर्ट जोयडा तालुका तहसीलदार प्रशासन यांच्याकडून जिल्हा प्रशासनाकडे सादर झाला आहे. जोयडा तहसीलदार प्रशासनाकडून नऊ टँकरद्वारे सध्या पाणीपुरवठा करण्याचे काम जलदगतीने सुरू झाले आहे.
जि. पं. ने लक्ष देण्याची मागणी
सध्या मायनॉल या गावात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. गावकऱ्यांनी याची तक्रार तालुका प्रशासनाकडे केली आहे. या गावची लघु पाणीपुरवठा योजना बंद पडली आहे. जि. पं. जोयडा यानी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी वेळीप यानी केली आहे. काही भागातील ओढ्याचे पाणी जलद अटत चालल्याने सर्वात मोठी झळ प्राण्यांना बसत आहे. दांडेली तालुका प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाकडे अहवाल सादर झालेला नाही. त्यानी लवकर सादर करून ग्रामस्थाना पाणी उपलब्ध करावे अशी मागणी होत आहे.