शहरात पाण्याचा ठणठणाट, उद्या पाणीपुरवठा होणार सुरळीत
कोल्हापूर :
काळम्मावाडी योजनेची देखभाल दुरूस्ती तसेच अमृत योजनेवरील मुख्य लाईनवरील क्रॉस कनेक्शनची कामामुळे सोमवारी सी आणि डी वॉर्ड वगळता शहरात पाण्याचा ठणठणाट होता. महापालिकेने पाच टँकरने 70 ठिकाणी पाणीपुरवठा केला. देखभाल आणि क्रॉस कनेक्शनचे काम युध्दपातळीवर सुरू असून आज मंगळवारी रात्री ते पुर्ण होईल आणि बुधवारी (दि.12) शहरात पूर्ववत पाणीपुरवठा होईल, अशी माहिती जल अभियंता हर्षजीत घाटगे यांनी दिली.
काळम्मावाडी देखभाल आणि क्रॉस कनेक्शनच्या कामामुळे ए, बी, वॉर्ड अंतर्गत फुलेवाडी रिंगरोड, गजानन कॉलनी, जयभवानी कॉलनी, अयोध्या कॉलनी, गजानन कॉलनी, लक्ष्मीनारायण कॉलनी, संतसेना, अभीयंता कॉलनी मातंग वसाहत, बोंद्रेनगर पुर्ण रिंगरोड, नाना पाटीलनगर, राजोपाध्ये नगर, राजेसंभाजीनगर, गंधर्व नगरी, क्रशर चौक झोपडपटटी, गजलक्ष्मी पार्क, व राधानगरी रोड परिसर सलग्नीत ग्रामिण भाग व ई वॉर्ड अंतर्गत संपूर्ण राजारामपुरी परिसर, शाहुमिल कॉलनी, वैभव हौसिंग सोसायटी, प्रतिभानगर, इंगळेनगर, दौलतनगर, उद्यमनगर, शास्त्राrनगर, अंबाई डीफेन्स परिसर, राजाराम रायफल, काटकरमाळ, कावळानाका, संपूर्ण कसबा बावडा, लाईन बाजार, लोणार वसाहत, राजीव गांधी वसाहत, महाडीक वसाहत, रूईकर कॉलनी, लिशा हॉटेल परिसर, सदर बाजार, कदमवाडी, जाधववाडी, बापट कॅम्प, शिवाजी पार्क, फ्रेंड्स कॉलनी, ताराबाई पार्क, नागाळापार्क, रमणमळा, शाहुपूरी व्यापार पेठ, व्हीनस कॉर्नर, शाहुपूरी, राजारामपुरीतील काही भागात पाणी आले नाही.
काळम्मावाडी देखभालीचे काम मंगळवारी दुपारपर्यंत पूर्ण होणार आहे. तसेच अमृत योजनेतील क्रॉस कनेक्शन जोडण्याचे काम सोमवारी रात्रभर सुरू होते. मंगळवारी रात्री उशिरा हे काम पूर्ण होऊन पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी सर्व भागात पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा होईल, असे जल अभियंता हर्षजीत घाटगे यांनी सांगितले.