रामलिंगखिंड गल्लीत 24 तास पाण्यासाठी जलवाहिनी
काम युद्धपातळीवर : एलअँडटीकडून प्रयत्न
बेळगाव : शहरात 24 तास पाणीपुरवठ्यासाठी एलअँडटीकडून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी शहरातील विविध भागात जलवाहिन्या घातल्या जात आहेत. रामलिंगखिंड गल्लीमध्ये खोदाई करून जलवाहिनी घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ज्याठिकाणी 24 तास पाणीपुरवठ्याची जलवाहिनी नाही, त्याठिकाणी या कामाला प्राधान्य दिले जात आहे. दक्षिण भागातील वडगाव, शहापूर, भारतनगर, खासबाग, राणी चन्नम्मानगर, जुनेबेळगाव, टीचर्स कॉलनी आदी भागातील काही ठिकाणी 24 तास पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिन्या घालण्यात आल्या आहेत. त्याबरोबर इतर ठिकाणीही जलवाहिन्या घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. 2025 पर्यंत शहरात 24 तास पाणीपुरवठ्याचे उद्दिष्ट एलअँडटी कंपनीने ठेवले आहे. यासाठी शहराच्या 9 ठिकाणी जलकुंभ उभारण्याचे कामही प्रगती पथावर आहे. या जलकुंभाच्या माध्यमातून शहराला 24 तास पाणीपुरवठा केला जाणार आहे.
चन्नम्मानगरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर 24 तास पाणी
चन्नम्मानगर येथे प्रायोगिक तत्त्वावर 24 तास पाणीपुरवठा केला जात आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर लवकरच शहरातील इतर भागातही 24 तास पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. यासाठी एलअँडटी कंपनीकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.