कपिलेश्वर उड्डाणपुलाजवळ पाणी गळती
11:14 AM Nov 13, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : शहरात विविध ठिकाणी पाणी गळतीचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होऊ लागला आहे. एकीकडे एलअॅण्डटी 24 तास पाण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे शहरात सातत्याने गळती लागून पाण्याचा अपव्यय होत आहे. तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेऊन पाणी गळती थांबवावी, अशी मागणी होत आहे. कपिलेश्वर उड्डाणपुलाच्या प्रवेशद्वारावरच जलवाहिनीला गळती लागली आहे. मागील कित्येक दिवसांपासून पाणी वाया जाऊ लागले आहे. एसपीएम रोडवर पाणी वाहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच ये-जा करणाऱ्या पादचारी, वाहनधारकांना धोका निर्माण होत आहे. याचबरोबर शहरातील इतर ठिकाणीही गळती सुरूच आहे. त्यामुळे विनाकारण दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article