महाविस्फोटाच्या 10-20 कोटी वर्षांनी ब्रह्मांडात पाण्याची निर्मिती
जीवसृष्टीच्या उत्पत्तित महत्त्वाची भूमिका
सुपरनोव्हा (महाविस्फोट) ब्रह्मांडाच्या उत्पत्तित महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात आणि ग्रहांची निर्मिती तसेच जीवसृष्टीच्या शक्यतांसाठी आवश्यक घटकांची निर्मिती करतात. पाण्याला जीवसृष्टीच्या उत्पत्तिशी संबंधित एक महत्त्वाचा घटक मानले जाते. पाणी धातू आणि वायूंच्या मिश्रणांनी निर्माण होऊ शकते असे संकेत यापूर्वीच्या संशोधनांमधून मिळाले आहेत. परंतु नव्या संशोधनानुसार महाविस्फोटामुळे 10-20 कोटी वर्षांनी ब्रह्मांडात पाण्याची निर्मिती झाली असावी.
पाण्याची निर्मिती पूर्वीच्या अपेक्षेच्या तुलनेत अधिक लवकर झाली आणि हे प्रारांभिक आकाशगंगांचा एक महत्त्वपूर्ण हिस्सा असू शकतो असे वैज्ञानिकांचे मानणे आहे. हे संशोधन नेचर एस्ट्रोनॉमी नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. संशोधनासाठी वैज्ञानिकांनी दोन वेगवेगळ्या सुपरनोव्हा विस्फोटांचे कॉम्प्युटर मॉडेल तयार केले.
पहिले मॉडेल सूर्यापेक्षा 13 पट अधिक आकारमान असलेल्या ताऱ्याचे होते आणि दुसरे सूर्याच्या आकारमानापेक्षा 200 पट अधिक मोठ्या ताऱ्याचे होते. या मॉडेल्सच्या माध्यमातून वैज्ञानिकांनी विस्फोटानंतर निर्माण झालेल्या घटकांचे विश्लेषण केले. पहिल्या मॉडेलमध्ये 0.051 सौर द्रव्यमान आणि दुसऱ्या मॉडेलमध्ये 55 सौर द्रव्यमानाच्या इतक्या ऑक्सिजनची निर्मिती झाली होती. हे अत्याधिक उष्मा आणि घनत्वाच्या स्थितीमुळे शक्य झाले. जेव्हा हा ऑक्सिजन थंड झाला आणि सुपरनोव्हाकडून उत्सर्जित हायड्रोजनच्या संपर्कात आला तेव्हा घनदाय वायूरुपी फुग्यांमध्ये पाण्याची निर्मिती झाली. हे गुच्छ नंतर दुसऱ्या पिढीचे तारे आणि ग्रहांच्या निर्मितीत सहाय्यक ठरले असण्याची शक्यता आहे.
3.8 अब्ज वर्षांपूर्वी....
पाणी प्रारंभिक आकाशगंगांच्या निर्मितीदरम्यान अस्तित्वात राहिले असेल तर हे ग्रहांच्या निर्मिती प्रक्रियेत देखील सामील राहिले असावे असा संशोधकांचा अनुमान आहे. याचा अर्थ पाण्याचे अस्तित्व ब्रह्मांडाच्या प्रारंभिक इतिहासातच सुनिश्चित झाले होते, ज्यामुळे पुढील काळात ग्रह आणि जीवसृष्टीची शक्यता निर्माण झाली. परंतु भूवैज्ञानिकांनी इसुआ ग्रीनस्टोन बेल्टमधून पिलो बेसॉल्टचा (पाण्याखाली विस्फोटादरम्यान निर्माण होणारा एकप्रकारचा खडक) एक नमुना हस्तगत केला होता, जो 3.8 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर पाणी अस्तित्वात होते याचा पुरावा देतो.