For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मानवी मेंदू 4 वेळा करतो मोठा बदल

06:08 AM Dec 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
मानवी मेंदू 4 वेळा करतो मोठा बदल
Advertisement

जाणून घ्या कुठल्या वयात येतो गोल्डन पीरियड

Advertisement

कॅम्ब्रिज विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी 0-90 वयोगटातील 3800 लोकांच्या मेंदूच्या  एमआरआय स्कॅनचे अध्ययन केले आहे. यातून मानवी मेंदू आयुष्यात केवळ 4 वेळा अचानक अत्यंत मोठा बदल करत असल्याचे कळले आहे. उर्वरित काळात हा मेंदू अचानक बदलत राहतो. 9 वर्षे, 32 वर्षे, 66 वर्षे आणि 83 व्या वर्षी हा बदल होत असतो.

मेंदूच्या वायरिंगमध्ये होते काय?

Advertisement

मेंदूत 86 अब्ज छोटे न्यूरॉन असतात, हे एकमेकांशी व्हाइट मॅटरने जोडलेले असतात. घरातील विजेच्या तारांप्रमाणे हे स्वरुप असते. जितक्या चांगल्या आणि जलद तारा असतील तितकाच मेंदू तल्लख असेल, स्मरणशक्ती चांगली राहिल, नव्या गोष्टी लवकर शिकता येतील.

पहिला मोठा बदल : वयाच्या 9 व्या वर्षी

बालपण संपण्याच्या स्थितीत मेंदूच्या तारा अत्यंत वेगाने निर्माण होतात आणि मजबूत होतात. या वयात जे काही शिकले जाते (भाषा, गणित, संगीत, खेळ) ते आयुष्यभर विसरले जात नाही. याचमुळे 5-10 वयोगटातील गोल्डन पीरियड म्हटले जाते.

दुसरे आणि सर्वात आकर्षक बदल : वयाच्या 32 व्या वर्षी

या वयात मेंदू अत्यंत पीकवर असतो, सर्व तारा एकदम परिपूर्ण जोडलेल्या असतात, स्मरणशक्ती, एकाग्रता, नवे कौशल्य शिकणे सर्व काही वेगाने घडते. याचमुळे बहुतांश वैज्ञानिक, खेळाडू, लेखक आणि उद्योजक 30-35 वयादरम्यान स्वत:चे सर्वात चांगले काम करत असतात.

तिसरा बदल : वयाच्या 66 व्या वर्षी

आता मेंदूच्या तारा हळूहळू पातळ होऊ लागतात, नव्या गोष्टी शिकणे काहीसे अवघड वाटते. परंतु जुन्या आठवणी आणि जीवनाचा अनुभव सर्वात मजबूत असतो. या वयात लोक सर्वात समजुतदार आणि योग्य निर्णय घेणारे असतात.

चौथा अन् अखेरचा बदल : वयाच्या 83 व्या वर्षी

आता तारा अत्यंत कमकुवत होतात, स्मरणशक्ती कमी होऊ लागते, अल्झायमर सारख्या आजारांचा धोका वाढतो. परंतु जे लोक पूर्ण आयुष्य पुस्तक वाचन, कोडी सोडविणे, हिंडणे आणि नव्या गोष्टी शिकत राहतात, त्यांचा मेंदू 90-95 वयांपर्यंतही कुशाग्र राहतो.

आपण काय करू शकतो?

- वर्षांपर्यंतच्या मुलांना अनेक गोष्टी शिकवा.

-50 वर्षांनंतरही पुस्तक, सुडोकू, हिंडणे सोडू नका.

-उत्तम झोप, योग्य आहार आणि काहीसा व्यायाम मेंदूला कायम तरुण ठेवतो.

तुमचे वय कितीही असतो, तुमचा मेंदू अद्याप शिकण्यास आणि बदलण्यास तयार आहे. केवळ त्याला संधी देत राहण्याची गरज आहे.

Advertisement
Tags :

.