दुधगंगा कालव्यातून 19 व 20 रोजी पाणी उपसाबंदी
कार्यकारी अभियंता स्मिता माने यांची माहिती: शेतीसह औद्योगिक क्षेत्रासाठीही उपसाबंदी
कोल्हापूर प्रतिनिधी
दुधगंगा नदीच्या डावा व उजव्या कालव्याच्या दोन्ही तीरावरील सिंचनासाठी व बिगर सिंचन (औद्योगिक) पाणी वापरणाऱ्या कोल्हापूर जिह्यातील लाभधारक बागायतदार, सह. पाणी पुरवठा संस्था तसेच औद्योगीक पाणी वापरणारे ग्राहक यांच्यासाठी दुधगंगा कालव्यामधून पाणी उपसा करणाऱ्या सर्व योजनांवर 19 व 20 डिसेंबर रोजी उपसा बंदी केली जाणार आहे. परिस्थितीनुसार पुढील आदेश स्वतंत्रपणे निर्गमित केले जातील, अशी माहिती कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर),च्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे, जिह्यातील राधानगरी, भुदरगड व करवीर तालुक्यामधून पाणी कालव्याच्या शेवटच्या भागापर्यंत कमी कालावधीत व पाण्याची बचत करुन पोहचविणे गरजेचे असल्याने, अपरिहार्य कारणास्तव उपसाबंदी राबवावी लागत आहे. तरी जिल्हयातील राधानगरी, भुदरगड व करवीर तालुक्यामधील लाभधारक बागायतदार , सह. पाणी पुरवठा संस्था तसेच औद्योगीक पाणी वापरणारे ग्राहक यांनी लाभक्षेत्रामधील लाभधारक बागायतदार, सह. पाणी पुरवठा संस्था यांनी सद्यपरिस्थितीचा जाणिवपूर्वक विचार करुन जलसंपदा विभागास सहकार्य करावे असे आवाहन माने यांनी केले आहे.