महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पर्वरी, साळगाववर जलसंकट

12:59 PM Dec 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पाणीपुरवठा होईपर्यंत नववर्ष उजाडण्याची शक्यता

Advertisement

पणजी : उत्तर गोव्यातील आणि प्रामुख्याने पर्वरी व साळगांव मतदारसंघातील पाणी संकट सुटण्यासाठी नवीन वर्ष 2024 उजाडणार अशी चिन्हे दिसत असून पाणी नसल्याने वैतागलेल्या लोकांना आता नवीन वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तिळारी धरण आणि गोव्याकडे येणारे कालवे यांचे दुऊस्तीकाम पूर्ण झाले असले तरी इतर काही कारणांमुळे तेथील पाणी अद्याप गोव्याच्या दिशेने आलेलेच नाही. तिळारीतून पाणी गोव्यात आल्यानंतर त्यावर प्रक्रिया कऊन ते सोडण्यासाठी एक ते दोन दिवसांचा कालावधी जातो. त्यामुळे तिळारीतून पाणी आल्याशिवाय पाणी पुरवठा सुरळीत होणे शक्य नाही, असे सार्वजनिक बांधकाम खाते सूत्रांचे म्हणणे आहे.

Advertisement

पर्वरी येथील जलशुद्धीकरण प्रकल्प बंदच असून तो सुऊ झाल्याशिवाय पर्वरीमधील पाणी पुरवठा मार्गी लागणे कठीण आहे. तिळारीचे पाणी आल्याशिवाय तो प्रकल्प सुऊ होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. तिळारी येथून या एक-दोन दिवसात पाणी आले तर 30 डिसेंबरपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकतो नाहीतर नवीन वर्ष उजाडण्याची शक्यता खात्याच्या सूत्रांनी वर्तवली आहे. तिळारी धरण बांधून 30 वर्षे पूर्ण झाल्याने आणि कालव्याची अनेक ठिकाणी पडझड झाल्यामुळे महाराष्ट्र सरकारने दुऊस्तीचे काम हाती घेतले होते. तेव्हा 22 डिसेंबरपर्यंत दुऊस्ती पूर्ण करण्याची हमी देण्यात आली होती. त्या हमीनुसार काम पूर्ण झाले म्हणून 23 डिसेंबरपासून तिळारीचे पाणी येईल व उत्तर गोव्यातील पाणी पुरवठा सुरळीत होईल, अशी आशा जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी वर्तवली होती. परंतु शेवटी ती फोल ठरल्याचे स्पष्ट झाले. नववर्षासाठी गोव्यात पर्यटकांची रेलचेल सुऊ झाली असून त्यांना पाण्याची मोठी गरज भासणार आहे. ती पूर्ण न झाल्यास पर्यटकांची नाराजी गोव्यासाठी भोवण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article