उकळत्या पाण्यातही जिवंत राहणारा ‘वॉटर बियर’
पृथ्वीवर असे अनेक जीव आहेत, जे वेळोवेळी चकित करत असतात. असाच एक जीव वॉटर बियर असून त्याला शास्त्राrय भाषेत टार्डिग्रेड म्हटले जाते. या जीवाचे वैशिष्ट्या म्हणजे हा उकळत्या पाण्यातही जिवंत राहू शकतो. वॉटर बियर हा जगातील सर्वात अदभूत आणि रहस्यमय जीवांपैकी एक आहे. हा एकप्रकारचा सुक्ष्म जीव असून जो पाण्यात राहतो.
कठिणातील कठिण स्थितीतही हा जीव जिवंत राहू शकतो हे याचे सर्वात मोठे वैशिष्ट्या आहे. उकळते पाणी, बर्फ, किरणोत्सर्गयुक्त पाणी आणि व्हॅक्यूम यासारख्या स्थितीतही हा जीव जिवंत राहू शकतो. या जीवाचा आकार सुमारे 0.3 ते 0.5 मिलिमीटर इतकाच असतो.
पाणी उकळत त्याचे तापमान 100 अंश सेल्सिअस झाले तरीही त्यात वॉटर बियर जिवंत राहतो. हा जीव या स्थितीतही जिवंत राहण्यामागील असलेल्या कारणाला क्रिप्टोबायोसिस म्हटले जाते. क्रिप्टोबायोसिस एक अशी शारीरिक स्थिती आहे, ज्यात जीव स्वत:च्या शरीराच्या क्रियाशीलतेला जवळपास पूर्णपणे संपवित असतो आणि मेटाबॉलिजम पूर्णपणे थांबत असते. या प्रक्रियेदरम्यान वॉटर बियर स्वत:च्या पेशींमध्ये एकप्रकारचे ग्लिसेरॉल नावाचा रासायनिक पदार्थ जमा करतो, जो त्यांना उष्णता किंवा अत्यंत अधिक थंडीपासून वाचवत असतो.
टनिंग प्रक्रिया
क्रिप्टोबायोसिससोबत हा जीव टनिंग करून स्वत:ला वाचवत असतो. या अवस्थेत वॉटर बियर स्वत:च्या पेशींचे पाणी काढून घेत स्वत:च्या शारीरिक अवयवांना आकुंचित करून घेतो आणि स्वत:च्या बाहेर एकप्रकारचे कवच निर्माण करतो, जे त्यांना अत्याधिक उष्णता आणि थंडीपासून वाचविते. हा जीव या स्थितीत कित्येक महिने, वर्षे किंवा दशकांपर्यंत जिवंत राहू शकतो हे याचे वैशिष्ट्या आहे.