For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ठेकेदार नको, कचरा प्रकल्प मनपानेच चालवावा! भाजप- ताराराणी आघाडीची मनपा प्रशासकांकडे मागणी

12:39 PM Jan 04, 2024 IST | Abhijeet Khandekar
ठेकेदार नको  कचरा प्रकल्प मनपानेच चालवावा  भाजप  ताराराणी आघाडीची मनपा प्रशासकांकडे मागणी
BJP-Tararani alliance
Advertisement

जुने ठेकेदारस आडथळे आणून नवीन टेंडर काढल्याचा आरोप

कोल्हापूर प्रतिनिधी

गेल्या वर्षीपासून महापालिका लाईन बाजार, झुम प्रकल्पालगत असणारा कचरा प्रक्रिया प्रकल्प स्वत: चालवत आहे. याबाबत तक्रार नसताना आणि महापालिकेची आर्थिक बचत होत असताना पुन्हा नव्याने कोणत्या तरी कंपनीला प्रकल्प चालवायला देणे योग्य नाही. त्यामुळे कचरा प्रकल्प ठेकेदाराला न देता मनपानेचे चालवावा, अशी मागणी भाजप-ताराराणी आघाडीचे माजी पदाधिकारी, नगरसेवकांनी महापालिका प्रशासकांकडे केली.

Advertisement

यावेळी माजी नगरसेवक सत्यजित कदम म्हणाले, झुम प्रकल्पातील प्रस्तावित 53 टनाचा प्रकल्पही रखडला आहे. हा प्रकल्पही ताब्यात घेऊन स्वत: चालवल्यास महापालिकेची आर्थिक बचत होऊन कचऱ्याचे निवारण करणे योग्य होईल. बचत झालेल्या पैशातून देखभाल दुरुस्ती करणे किफायतशीर ठरेल आणि त्यातून प्रकल्प सुरळीत सुरु होऊन कचरा प्रक्रियेच्या तक्रारी निकाली काढता येतील.
झुम प्रकल्पाच्या ठिकाणी मनपाने कचरा प्रकल्प एका कंपनीला चालवण्यासाठी दिला होता. त्यांना जाणूनबुजून अडथळे आणून प्रकल्प दुसऱ्या कंपनीला कसा चालवायला दिला. त्याच प्रकल्पावर पुन्हा टेंडर काढून आणखी कोणत्यातरी कंपनीला देण्याचा अट्टाहास महापालिका प्रशासन का करत आहे, असा सवाल माजी नगरसेवक अशिष ढवळे, वैभव माने यांनी केला. कचरा प्रकल्पाबाबतीत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

भाजप-ताराराणी आघाडीचे सवाल
- निविदा प्रक्रियेपूर्वी तांत्रिक मान्यतेशिवाय राबवलेली प्रक्रिया योग्य आहे काय?

Advertisement

- कोल्हापूर ग्रीन एनर्जीच्या मशिनरींचा उल्लेख करुन टेंडर काढलेले असताना नवीन ठेकेदारास संपूर्ण मशिनरी बसविण्यासाठी का सांगितले जात आहे?

-टेंडर प्रक्रिया किमान 1 वर्ष सुरु असल्याने ही प्रक्रिया तशीच पुढे घेऊन जाणे चुकीचे नाही काय?

Advertisement

.