For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओएनडीसी‘तून उद्योजकांना नवीन व्यासपीठ

05:55 PM Nov 28, 2024 IST | Radhika Patil
ओएनडीसी‘तून उद्योजकांना नवीन व्यासपीठ
ONDC provides a new platform for entrepreneurs
Advertisement

कोल्हापूर : 
भारत सरकारने ‘ओएनडीसी‘ हे डिजीटल व्यापारासाठी उत्पादक व ग्राहकांसाठी खुले व विश्वासार्ह बाजारपेठ उपलब्ध करुन दिले आहेत. थायलंड सरकार सिंगापूरच्या ‘सायनकॅच‘ कंपनीच्या माध्यमातून यामध्ये करारबद्ध झाले असून कोल्हापूरसह महाराष्ट्रातील छोट्या, मोठ्या उद्योजकांना हक्काची ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करुन दिल्याची माहीती थायलंड सरकारचे वाणिज्य सल्लागार व ‘गोकुळ‘चे संचालक डॉ. चेतन नरके यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

Advertisement

डॉ. चेतन नरके म्हणाले, सध्या ऑनलाईन खरेदीचे प्रमाण खूप वाढले आहे. यामध्ये अनेक कंपन्या सक्रीय असून एखादी वस्तू ऑनलाईन खरेदी केली तर त्या वस्तूच्या किमंतीतील 45 टक्के हिस्सा ती संबधित कंपनी घेतले. यामुळे उत्पादकाला फटका बसतोच, पण ग्राहकालाही त्याची झळ सोसावी लागते. महाराष्ट्रातील गूळ, केळी, कपडे, चप्पल, दागिने, काजूसह इतर शेती उत्पादनांचीही ऑनलाईन खरेदी-विक्री होते. यासाठी, केंद्र सरकारने ‘ओएनडीसी‘च्या माध्यमातून उत्पादकांना हक्काची व खात्रीशीर बाजारपेठ उपलब्ध करुन दिली आहे. विशेष म्हणजे थायलंड सरकारही यामध्ये सहयोगी असून त्याची जबाबदारी माझ्यावर दिली आहे.

थायलंड, इंडोनिशियासह आशिया खंडात ‘ओएनडीसी‘च्या माध्यमातून आपल्या देशातील उत्पादने ऑनलाईन विक्री करता येणार आहेत. सध्या इतर कंपन्या सारखे 45 टक्के हिस्सा न घेता केवळ 5 टक्के हिस्सावर उत्पादक व ग्राहकांना सेवा देणार आहे. त्याचा फायदा माझ्या कोल्हापूर, महाराष्ट्रासह देशभरातील शेतकरी, छोटे-मोठे उद्योजकांना निश्चित होणार आहे. माझ्या सामान्य उद्योजकाला आंतरराष्ट्रीय पातळीवरील नवीन दालन खुले करुन देण्याचा मानस आहे. यामुळे कोल्हापूरसह महाराष्ट्राच्या अर्थकारणाला गती मिळण्यास मदत होणार असल्याचे डॉ. चेतन नरके यांनी सांगितले. भारत व थायलंड पोस्ट ऑफीसच्या माध्यमातून सेवा देशभरातील कुरियर एजन्सीच्या माध्यमातून सेवा दिली जाऊ शकते. पण, कमी पैशात वेळेत खरेदी केलेली वस्तू ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी भारत व थायलंड देशातील पोस्ट ऑफीसेस महत्वाचे दुवा आहेत. त्यांना सहभागी करुन घेण्यासाठी चर्चा झालेली आहे. लवकरच त्यांच्याशीही करार होईल, असे डॉ. नरके यांनी सांगितले.

Advertisement

देशात 116 बिलियन डॉलर ऑनलाईन व्यवहार देशभरात ऑनलाईन खरेदीचे प्रमाण खूप वाढले आहे. वर्षभरात या खरेदी-विक्रीच्या माध्यमातून 116 बिलीयन डॉलर ऑनलाईन बाजारात उलाढाल होत आहे. यामध्ये ‘ओएनडीसी‘च्या माध्यमातून निश्चित वाढ होईल, असा विश्वास डॉ. चेतन नरके यांनी व्यक्त केला.

Advertisement
Tags :

.