महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दहशतवादी पन्नूला मारण्याचा कट उधळला?

06:03 AM Nov 23, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अमेरिकेच्या ‘अज्ञात’ अधिकाऱ्याचा दावा, अधिकृततेसंबंधी संशय

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

अमेरिकेत वास्तव्यास असलेला खलिस्तानी दहशतवादी गुरुपतवंतसिंग पन्नू याला अमेरिकेतच ठार मारण्याचा झालेला प्रयत्न अमेरिकेने काही महिन्यांपूर्वी उधळला होता, असा खळबळजनक दावा एका अमेरिकन वृत्तसंस्थेने केला आहे. एका अमेरिकन ‘अज्ञात’ अधिकाऱ्याच्या हवाल्याने हा दावा करण्यात आला आहे. मात्र, या दाव्याच्या अधिकृततेसंबंधी संशय व्यक्त करण्यात येत आहे.

पन्नू याच्या हत्येच्या प्रयत्नात भारताचा हात आहे, असा आरोपही अमेरिकेने केला होता. तसेच भारताला पुन्हा असे न करण्यासंबंधी इशारही दिला होता. तथापि, अमेरिकेने याची वाच्यता केली नाही, असे या वृत्तसंस्थेच म्हणणे आहे. मात्र, ही माहिती कोठून मिळाली या संबंधीचे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. तसेच अज्ञात अधिकाऱ्याच्या हवाल्याने हा दावा करण्यात आल्याने त्याच्या सत्यतेविषयी बऱ्याच शंका व्यक्त केल्या जात आहेत.

इशाऱ्यानंतर प्रयत्न बंद?

पन्नू याच्या हत्येचा प्रयत्न भारताकडून करण्यात येत होता. पण अमेरिकेला या कटाचा सुगावा लागल्यानंतर अमेरिकेने भारतीय प्रशासनाला इशारा दिला. त्यामुळे पन्नूला मारण्याचे प्रयत्न थांबविण्यात आले. त्यामुळे अमेरिकेने या घडामोडींची वाच्यता केली नाही, असेही या वृत्तसंस्थेचे म्हणणे आहे.

पन्नूने दिली होती धमकी

पन्नू याने एअर इंडियाची विमाने उडविण्याची धमकी दिली होती. तसेच 19 नोव्हेंबरला एअर इंडियाच्या कोणत्याही विमानाने प्रवास न करण्याची धमकी त्याने अमेरिकेतील शीख लोकांना दिली होती. त्याच्या धमकीनंतर दिल्ली आणि पंजाबच्या विमानतळांवर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली होती. तसेच एनआयएने पन्नू याच्याविरोधात प्रकरण नोंद करुन तपास चालविला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article