स्थानिक वाहनधारकांना त्रास दिल्यास पोलीसप्रमुखांकडे तक्रार करण्याचा इशारा
नंदगड : आवश्यक कागदपत्रे व हेल्मेट नसल्याचे कारण पुढे करून नंदगड परिसरातील वाहनधारकांना नंदगड पोलिसांकडून दंड लावला जात आहे. त्यामुळे स्थानिक लोकांना आर्थिक व मानसिक त्रास होत आहे. त्यासाठी वाहने अडविणे थांबवावीत अन्यथा बेळगाव पोलीसप्रमुखांशी संपर्क साधून योग्य तो क्रम घेतला जाईल, असा सज्जड इशारा नंदगड पोलीस स्थानकाच्या पीएसआय मेदार यांना खासदार विश्वेश्वर हेगडे यांनी सोमवारी दिला. नंदगड पोलीस स्टेशनच्या पीएसआय आपल्या काही सहकाऱ्यांना घेऊन हेब्बाळ, नंदगड, बेकवाड, माचीगड आदी गावच्या हद्दीतील रस्त्यावर दिवसभर थांबतात. वाहनावरून येणाऱ्या स्थानिक दुचाकी व चारचाकी वाहनांना अडवून त्यांना दंड लावण्याचा प्रकार सुरू आहे. संतापलेल्या जनतेने यावेळी पोलिसांच्या विरोधातच खासदारांच्याकडे तक्रार केली. त्या तक्रारीनुसार पीएसआय मेदार यांना खासदारांनी सूचना केली आहे.