वारणा साखर कारखान्याची ३० टन साखर चोरी; ट्रक मालकास अटक, २३ टन साखर जप्त
वारणानगर / प्रतिनिधी
येथील श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने विक्रीसाठी पाठवलेली तीस टन साखर चोरल्या प्रकरणी ट्रक मालक सोहेल दस्तगीर पटेल रा. लक्ष्मीनगर,मलकापुर ता. कराड जिल्हा सातारा यास कोडोली पोलीसांनी अटक करून ट्रक सह त्यांच्या ताब्यात असलेली २३ टन ८५० किलो साखर जप्त केली आहे.
दिग्वीजय बाळासो मल्लाडे रा. बिरदेव मंदीर जवळ दानोळी ता शिरोळ जि. कोल्हापुर साईनाथ ट्रासपोर्ट शिरोली व्यवसायाकाने कोडोली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दि. ७ मार्च रोजी दाखल करण्यात आला होता यामध्ये ट्रक मालक - सोहेल दस्तगीर पटेल यास अटक झाली असून ट्रक चालक सिध्दांत गवंड,मनोहर केदारे हे दोघे अद्याप फरारी आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
वारणा कारखान्यात साखरेने भरलेला ट्रक दि. ८ मार्च रात्री २१.२२ वा. पर्यंत ब्रिटानिया इंडस्ट्रीज कंपनीस न उतरता स्वतःच्या फायद्याकरीता फिर्यादी ची फसवणुक करुन अपहार केले बाबत दाखल गुन्हातील चोरीला गेलेल्या साखर पोत्यापैकी २३ टन ८५० किलो मुद्देमाल ट्रकसह जप्त केला आहे सदर गुन्ह्यात ६ टन २५० किलो वजनाची साखर जप्त करणे बाकी आहे. कोडोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक कैलास कोडग फौजदार नामदेव दांडगे व पोलीस कर्मचारी यानी तीन दिवसात या गुन्ह्याचा छडा लावला आहे.