For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोव्याचे वारकरी चालले विठुरायाच्या दर्शनाला

06:21 AM Jul 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
गोव्याचे वारकरी चालले विठुरायाच्या दर्शनाला
Advertisement

काणकोणहून आली पायी दिंडी : दररोज सुमारे 30-35 कि. मी. चा प्रवास : 60 ते 80 वयोगटातील महिलांचाही समावेश

Advertisement

बेळगाव : पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा एक मोठा सणच. हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती. आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात, आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहात असतो.

सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी थेट गोव्यावरून गेली तीन वर्षे पंढरपूरला पायी वारी करत आहेत. गोव्याच्या काणकोण या भागातून 420 किमीचे अंतर कापून  दररोज सुमारे 30-35 किमी चालत पंढरीची वारकरी ‘उन्ह पावसाची चिंता कोण करी’ असे म्हणत हे विठ्ठल भक्त पंढरपूरला जात आहेत. या वारीत 60 ते 80 वयोगटातील महिलांचाही समावेश आहे. त्याचबरोबर युवकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. या वारीत एकूण 83 वारकरी आहेत. या वारीमध्ये पंढरपूरपर्यंत चालत जात असताना विठ्ठलाची भक्ती गीते, नृत्य आणि टाळ नाद यासारख्या गोष्टीचा वारीत आनंद घेत  हे वारकरी चालत आहेत. त्यांचा आजचा मुक्काम बेळगावच्या भुतरामहट्टी येथे असणार आहे.

Advertisement

3 वर्षांपूर्वी वारी सुरू झाल्यापासून प्रत्येक वर्षभरात वारीमध्ये सहभागी होण्यासाठी गोव्यातून  वारक्रयांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे त्याचबरोबर प्रत्येक घरातून किमान एक वारकरी सहभागी व्हावा हा त्यांचा उद्देश आहे.येत्या काही वर्षांत, पंढरपूरच्या या पदयात्रेत आमच्याकडे 200 हून अधिक वारी सहभागी होतील,ठ पागी म्हणाले.ते 15 जुलै पर्यंत पंढरपूर मध्ये पोहोचणार आहे  त्यानंतर  16 जुलैपर्यंत पंढरपूर येथे मुक्काम  करतील. 17 जुलै  पुन्हा परतीचा प्रवास सुरू होईल  आणि 18 जुलै रोजी  ते वारकरी गोव्यात परततील. यावेळी या वारीचे संयोजक सुरज नायगावकर, श्रवण नाईक , धर्मेंद्र पागी, रमनाथ देसाई, आशिष सावंत, निलेश गोसावी, दिकिष पागी, शुभम कानेकर, नवीन कुमार अन्य वारकरी मोठ्या संख्येने  सहभागी होते

Advertisement
Tags :

.