For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पत्नीला फिरवणाऱ्याचा पतीने काढला काटा

11:50 AM Jul 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
पत्नीला फिरवणाऱ्याचा पतीने काढला काटा
Advertisement

लक्ष्मेश्वर येथील घटना, तलवारीने पाडला मुडदा

Advertisement

बेळगाव : मुडलगी तालुक्यातील लक्ष्मेश्वर येथे सोमवारी सकाळी तलवारीने वार करून एका तरुणाचा भीषण खून करण्यात आला आहे. खून करणाऱ्या तरुणाने आपल्या पत्नीवरही तलवार हल्ला केला असून अनैतिक संबंधाच्या संशयावरून ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. मौलासाब यासीन मोमीन (वय 28) रा. लक्ष्मेश्वर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच गावातील अमोघ ढवळेश्वर (वय 27) याने हे कृत्य केले असून खुनानंतर काही तासांत मुडलगी पोलिसांनी अमोघला ताब्यात घेतले आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

तलवार हल्ल्यात अमोघची पत्नी शिल्पा ढवळेश्वर (वय 23) ही जखमी झाली असून तिला उपचारासाठी गोकाक येथील इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. कुलगोड पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. सोमवारी रात्रीपर्यंत अमोघची चौकशी करण्यात येत होती. चर्चेसाठी म्हणून बोलावून अमोघने मौलासाबचा काटा काढला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपासून शिल्पा व मौलासाब हे मोटारसायकलवरून फिरत होते. ही गोष्ट अमोघच्या लक्षात आल्यानंतर त्याने मौलासाबला ताकीद दिली होती. तरीही या दोघाजणांची जॉली राईड थांबली नाही. त्यामुळे अमोघने मौलासाबला सोमवारी सकाळी चर्चेसाठी म्हणून बोलावले. अमोघ व मौलासाब यांच्यातील चर्चा विकोपाला गेली. अमोघने त्याच्यावर तलवारीने वार केला. याचवेळी सोडवण्यासाठी आलेल्या पत्नी शिल्पावरही त्याने हल्ला केला. रस्त्याशेजारी घडलेल्या खुनाच्या या प्रकाराने लक्ष्मेश्वर परिसरात काहीकाळ घबराटीचे वातावरण होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.