महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वारी एनर्जीज यांचा आयपीओ खुला

06:24 AM Oct 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

सोलर पॅनल निर्मिती कंपनी वारी एनर्जीज लिमिटेड यांचा आयपीओ सोमवारी गुंतवणूकीसाठी खुला झाला आहे. सदरच्या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 4300 कोटी रुपये उभारणार असल्याची माहिती समोर येते आहे.

Advertisement

सदरचा आयपीओ 21 ऑक्टोबरला शेअर बाजारात खुला झाला असून या आयपीओसाठी 1427-1503 रुपये प्रति समभाग अशी किंमत निश्चित करण्यात आली आहे. 23 ऑक्टोबरपर्यंत गुंतवणूकदारांना यामध्ये बोली लावता येणार आहे. आयपीओ अंतर्गत कंपनी 3600 कोटी रुपयांचे ताजे समभाग सादर करणार आहे. हा निधी आगामी काळात होणाऱ्या प्रकल्पांसाठी वापरला जाणार असल्याचे कंपनीकडून सांगितले जात आहे.

पहिल्या दिवशीची स्थिती

वारी एनर्जीजच्या आयपीओला पहिल्या दिवशी एकूण 4.76 समभागांकरीता बोली लावण्यात आली यायोगे 2.26 पट सबस्क्रिप्शन प्राप्त करण्यात आले. बिगरसंस्थात्मक गुंतवणूकदारांनी 4.91 पट आयपीओ सबस्क्राइब केला होता. रिटेल गुंतवणूकदारांनी 2.42 पट आयपीओ सबस्क्राइब केला आहे. 23 ऑक्टोबरपर्यंत गुंतवणूक करता येणार असून सदरचा वारी एनर्जीज यांचा समभाग   शेअर बाजारात 28 ऑक्टोबरला सुचीबद्ध होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article