रिफांइड पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीत वाढ
पीपीएसी यांच्या आकडेवारीमधून माहिती सादर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्रमुख परदेशी बाजारांमधील मागणीच्या कारणांस्तव रिफांइड पेट्रोलियम उत्पादनांमध्ये निर्यातीचा कल राहिला आहे. या संदर्भातील माहिती पेट्रोलिय प्लॅनिंग अॅण्ड अॅनालिसिस सेल (पीपीएसी) यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीमधून स्पष्ट केले आहे.
यामध्ये ऑक्टोबरमध्ये निर्यात 12.7 टक्क्यांनी वाढली आहे. चालू महिन्यात रिफांइडमध्ये पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात वधारुन 51 लाख टनाच्या घरात पोहोचली आहे. ज्याचा सकारात्मक परिणाम म्हणून भारतीय निर्यातदारांची 3.3 अब्ज डॉलरची कमाई झाल्याची माहिती आहे.
पहिल्या सात महिन्यांमध्ये 4.2 टक्क्यांची वाढ
आर्थिक वर्ष 2025 च्या सुरुवातीच्या सात महिन्यांमधील आकडेवारीनुसार 4.2 टक्क्यांच्या वाढीसोबत 368 लाख टनावर राहिली आहे.
निर्यातीत या घटकांचा समावेश
मुख्य घटकांमध्ये पेटकोक, पेट्रोल आणि विमान इंधन यांच्या निर्यातीत प्रामुख्याने वृद्धी झाली आहे. पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांमधील उत्पादनांची कपात सुरु राहिल्यानेही जागतिक मागणीत वाढ राहिली आहे. मागील आठवड्यात आंतरराष्ट्रीय एनर्जीने तेलाचा जागतिक पुरवठा हा 2,90,000 बॅरेल प्रति दिन वाढून 1,029 लाख प्रतिदिन बॅरेलर राहिले आहे.