वारी एनर्जीज यांचा आयपीओ खुला
वृत्तसंस्था/ मुंबई
सोलर पॅनल निर्मिती कंपनी वारी एनर्जीज लिमिटेड यांचा आयपीओ सोमवारी गुंतवणूकीसाठी खुला झाला आहे. सदरच्या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 4300 कोटी रुपये उभारणार असल्याची माहिती समोर येते आहे.
सदरचा आयपीओ 21 ऑक्टोबरला शेअर बाजारात खुला झाला असून या आयपीओसाठी 1427-1503 रुपये प्रति समभाग अशी किंमत निश्चित करण्यात आली आहे. 23 ऑक्टोबरपर्यंत गुंतवणूकदारांना यामध्ये बोली लावता येणार आहे. आयपीओ अंतर्गत कंपनी 3600 कोटी रुपयांचे ताजे समभाग सादर करणार आहे. हा निधी आगामी काळात होणाऱ्या प्रकल्पांसाठी वापरला जाणार असल्याचे कंपनीकडून सांगितले जात आहे.
पहिल्या दिवशीची स्थिती
वारी एनर्जीजच्या आयपीओला पहिल्या दिवशी एकूण 4.76 समभागांकरीता बोली लावण्यात आली यायोगे 2.26 पट सबस्क्रिप्शन प्राप्त करण्यात आले. बिगरसंस्थात्मक गुंतवणूकदारांनी 4.91 पट आयपीओ सबस्क्राइब केला होता. रिटेल गुंतवणूकदारांनी 2.42 पट आयपीओ सबस्क्राइब केला आहे. 23 ऑक्टोबरपर्यंत गुंतवणूक करता येणार असून सदरचा वारी एनर्जीज यांचा समभाग शेअर बाजारात 28 ऑक्टोबरला सुचीबद्ध होण्याची शक्यता आहे.