वारणा कुस्ती महासंग्राम : सिकंदर शेख जनसुराज्य शक्ती; दिल्लीच्या मोनू दाहियावर मात
इराणचा अहमद मिर्झा वारणा साखर शक्ती श्री
दिलीप पाटील वारणानगर
वारणेच्या कुस्ती महासंग्रामातील हजारो कुस्ती शौकीनांची उत्कंठा शिगेला पोहचलेल्या तुल्यबळ झालेल्या खडाखडी लढतीत गंगावेशचा महान भारत केसरी पैलवान सिंकदर शेखने विरेंद्र आखाडा दिल्लीचा भारत केसरी मोनू दहियावर दुहेरी पट काढत निकाली डावावर विजय मिळवून या कुस्ती संग्रामातील प्रथम क्रमांकाचा मानाचा जनसुराज्य शक्ती श्री किताब पटकावला. या कुस्तीचे पंच म्हणून राष्ट्रीय पंच संभाजी वरुटे यानी काम पाहिले. पाच मिनटातच ही निकाली कुस्ती झाली.
वारणा साखर शक्ती श्री
दुस्रया क्रमांकाच्या वारणा साखर शक्ती श्री किताबासाठी झालेल्या लढतीत पुण्याच्या काका पवार आखाड्यांच्या महाराष्ट्र केसरी पै.
हर्षद-सदगीर याचेवर इराणचा आंतरराष्ट्रीय विजेता पै.अहमद मिर्झा यांच्यात अत्यंत झालेल्या चुरशीच्या लढतीत एकेरी पट काढत अहमद मिर्झा याने या कुस्ती महासंग्रामातील दुस्रया क्रमाकांचा वारणा साखर शक्ती श्री किताब पटकावला.
वारणा दूध संघ शक्ती
वारणा दूध शक्ती श्री किताबासाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीत देवठाणे कोल्हापूरचा महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील याने उलटी डावावर पंजाबचा भारत केसरी पै. लाली मांड ( लुधियाना) याला चितपट करून या महा संग्रामातील तिस्रया क्रमाकांचा वारणा दूध संघ शक्ती श्री किताब पटकावला.
वारणा बँक शक्ती
वारणा बँक शक्ती श्री किताबासाठी उपमहाराष्ट्र केसरी हनुमान आखाड्याचा पैलवान माऊली कोकाटे याने घुटना डावावर विजय मिळवत पंजाबचा राजस्थान केसरी पैलवान भिम याला चितपट करून वारणा बँक शक्ती श्री किताब पटकावला.
वारणा दूध साखर वाहतूक शक्ती
उपमहाराष्ट्र केसरी गंगावेश तालमीचा पै.प्रकाश बानकर याने दिल्ली बंद्री आखाड्याचा पै. अभिनायक सिंग यांचेवर निकाली डाव टाकून विजय मिळवत वारणा दूध साखर वाहतूक शक्ती श्री किताब पटकावला.
वारणा ऊस वाहतूक शक्ती
पुण्याचा राष्ट्रीय विजेता पै.दादा शेळके याने घिस्सा डाव टाकत हिमाचल केसरी पैलवान पालिंदर-मथुरा याला चितपट करत वारणा ऊस वाहतूक शक्ती किताब पटकावला.
वारणा बिलट्युब शक्ती
कर्नाटकचा कर्नाटक केसरी व गेली वर्ष वारणेच्या मैदानावर सलग सात वेळा विजय मिळवण्राया पै. कार्तिक काटे याने हरियानाचा आंतरराष्ट्रीय विजेता भारत केसरी पै.जितेंद्र त्रिपुडी यांच्यात झालेल्या अतंत्य चुरसीच्या लढतीत एकलांगी डावावर काटे याने त्रिपुडी याला चितपत केले.
वारणा शिक्षण शक्ती ...
सांगलीचा राष्ट्रीय विजेता पै.सुबोध पाटील याने घुटणा डावावर हनुमान आखाडा दिल्लीचा राष्ट्रीय विजेता पै. संदीप कुमार याच्यावर विजय मिळवत वारणा शिक्षण शक्ती श्री किताब पटकावला.
वारणा बझार व वारणा महिला शक्ती श्री
राष्ट्रीय विजेता पै.सतपाल सोनटक्के (टेंभुर्णी) विरुद्ध इराणचा आतंरराष्ट्रीय विजेता पै. रिजा इराणी यांच्यामध्ये झालेल्या लढतीत पै. सतपालने एकचाकी डावावर चितपट करत वारणा बझार - वारणा महिला शक्ती श्री किताब पटकावला.
ई. डी. एफ मान शक्ती श्री
महाराष्ट्र चॅम्पीयन पै. कालीचरण - सोलनकर, (गंगावेश) याने इराणी डाव टाकत दिल्लीचा राष्ट्रीय विजेता देव नरेला यांच्यावर एकलांगी डावावर विजय मिळवत कालीचरणने ई. डी. एफ मान शक्ती श्री किताब पटकावला.
वारणा नवशक्ती
महाराष्ट्र चॅम्पीयन वारणा आखाड्याचा पै. नामदेव केसरे याने निकाली डावावर हरियानाचा राष्ट्रीय विजेता पै.रवी कुमार याचेवर विजय मिळवून वारणा नवशक्ती श्री किताब पटकावला