For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुख्यमंत्री पदावरून दोन मंत्र्यांमध्ये वाक्युद्ध

06:42 AM Sep 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुख्यमंत्री पदावरून दोन मंत्र्यांमध्ये वाक्युद्ध
Advertisement

पदासाठी पक्षात अनेक ज्येष्ठ नेते : शिवानंद पाटील : मी शिवानंद पाटील यांच्यापेक्षा ज्येष्ठ : एम. बी. पाटील

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

मुख्यमंत्री पदाबाबत विजापूर जिल्ह्याचे मंत्री शिवानंद पाटील आणि मंत्री एम. बी. पाटील यांच्यामध्ये वाक्युद्ध झाले आहे. मुख्यमंत्री पदासाठी पक्षात एम. बी. पाटील यांच्यापेक्षाही अनेक ज्येष्ठ नेते आहेत. हे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्री झाल्यानंतर एम. बी. पाटील मुख्यमंत्री होतील, असे मंत्री शिवानंद पाटील यांनी म्हटले आहेत.

Advertisement

यावर प्रतिक्रिया देताना मंत्री एम. बी. शिवानंद पाटील यांनी मी त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ असल्याचे सांगितले. जोपर्यंत सिद्धरामय्या आहेत तोपर्यंत तेच मुख्यमंत्री असतील. मी बेंगळूरमध्ये विकासाच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेतली. मात्र, तेथे विकासाऐवजी राजकारणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्या निवासस्थानी एम. बी. पाटील यांनी भेट दिली तर त्यात काय चूक आहे? आमच्या पक्षाकडे खूप नेते ज्येष्ठ आहेत. सिनिअरनंतर ज्युनिअर्सचा नंबर लागतो, असे मंत्री शिवानंद पाटील यांनी सांगितले आहेत.

मंत्री एम. बी. पाटील मुख्यमंत्री झाल्यास माझी कोणतीच तक्रार नाही. याबाबत हायकमांड निर्णय घेईल. आमदार मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबद्दल ठरवतात. मात्र, मीडियाने माझ्या वक्तव्यावर वाद निर्माण केल्याचा आरोप शिवानंद पाटील यांनी केला. माझ्या खात्याच्या विकासकामांची माहिती देण्यासाठीच मी पत्रकार परिषद घेतली. चार पिकांना आधारभूत किंमत मिळण्याबाबत मी पत्रकार परिषद बोलावली होती. मीडियाने मूळ विषय बाजूला ठेवत वाद निर्माण केल्याचे ते म्हणाले.

काहीजण राजकारण करण्यात व्यग्र आहेत तर मी विकासकामे करण्यात व्यग्र आहे. मला दिलेल्या तीन खात्यांमध्ये मी विकासाशिवाय काहीही केलेले नाही. कोणीही मुख्यमंत्री होऊ शकतो. मंत्री सतीश जारकीहोळी, जी. परमेश्वर आदींच्या मुख्यमंत्रीपदासाठीच्या शर्यतीबद्दल बोलताना, ज्याला मुख्यमंत्री व्हायचे आहे त्याला होऊ द्या. आम्ही काँग्रेसमध्ये एक आहोत, मुख्यमंत्री कोणीही असो, आमचा पाठिंबा आहे. मुख्यमंत्री बदलाबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री शिवानंद पाटील म्हणाले, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना बदलले जाणार नाही, याची मला खात्री आहे. सिद्धरामय्या यांनी काहीही चुकीचे केलेले नाही, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसमधील शर्यतीच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना मंत्री शिवानंद यांनी, ही संपूर्ण वाद मीडियाने उभा केला आहे. सध्या मीडिया विकासाबाबत कोणतेच प्रश्न करत नाही. त्यामुळे मी मीडियासमोर येत नाही. मी काँग्रेसमधील ज्येष्ठ आहे आणि शिवानंद पाटील हे निजदमधून आले आहेत, या मंत्री एम. बी. पाटील यांच्या वक्तव्यावर बोलताना मंत्री शिवानंद म्हणाले, मी निजदमधून आलो असेन किंवा भाजपमधून आलो असेन. मला काँग्रेसमध्ये कोणी आणले, याचे उत्तर त्यांनी द्यावे, असे आव्हान दिले.

मुख्यमंत्री पदासाठी तयारी मात्र, 2028 करिता

Names of five candidates for Belgaum-Chikodi Constituency

आपण मुख्यमंत्री होण्याच्या उद्देशाने आवश्यक तयारी करीत आहे, मात्र सध्यासाठी नसून 2028 साठी, तोपर्यंत समर्थकांनी समाधानाने वाट पहावी, असे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. सुवर्ण विधानसौध येथे एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या मुडा प्रकरणात सापडल्यानंतर राज्यातील काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री बदलावरून चर्चेला ऊत आला आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये आघाडीवर कोण आहे, यावर प्रतिक्रिया देताना स्पष्टीकरण दिले. राज्यामध्ये मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्याच हेच असणार आहेत. मुख्यमंत्री बदलला जाणार नाही, राज्यातील सर्व आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

सध्या आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही. मुख्यमंत्रीपदाची अपेक्षाही नाही. अनेक जणांनी मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असल्याचे सांगितले आहे. यामध्ये कुस्ती खेळण्याची गरज नाही. राज्यामध्ये तशी कोणती परिस्थितीही नाही. आपण मात्र मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पाठिंबा दिला असल्याचे सांगितले.

Advertisement
Tags :

.