कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

युद्धामुळे भारतीय बाजारावर चिंतेचे ढग

06:08 AM Jun 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्सची 573 अंकांवर घसरण : इस्रायल इराण संघर्षाचा परिणाम

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

चालू आठवड्यातील अंतिम सत्रात भारतीय भांडवली बाजारावर जागतिक पाळीवरील स्थितीचा परिणाम राहिला आहे. यामध्ये इस्रायल आणि इराण यांच्यामधील सैन्याच्या हल्ल्या झाला. यामुळे तेलाने समृद्ध असणाऱ्या मध्य पूर्वमधील तणाव वाढला असून यांचा थेट परिणाम मुख्य निर्देशांकांवर झाला आहे. मुख्य कंपन्यांच्या निर्देशांकांमध्ये जवळपास 1.50 टक्क्यांपेक्षा अधिकची घसरण झाली आहे.

बीएसई सेन्सेक्स शुक्रवारच्या सत्रात 1100 पेक्षा जास्त अंकांनी घसरून 80,427.81 वर उघडला. मात्र तो अखेर 573.38 अंकांनी घसरुन निर्देशांक 81,118.60 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा  निफ्टी अखेर 169.61 ने प्रभावीत होत 24,718.60 वर बंद झाला.

बँक निफ्टी 1.18 टक्क्यांनी घसरली

निफ्टी मिडकॅप 100 आणि निफ्टी स्मॉलकॅप 100 निर्देशांक अनुक्रमे 0.24 टक्के आणि 0.43 टक्के घसरणीसह बंद झाले. क्षेत्रीय निर्देशांक मिश्रित राहिले. निफ्टी पीएसयू बँक आणि निफ्टी एफएमसीजी 1 टक्क्यांहून अधिक घसरले. निफ्टी धातू, फायनान्शियल सर्व्हिसेस, ऑटो, एनर्जी, फार्मा, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि ऑइल अँड गॅसमध्येही घसरण नोंदवली.

 घसरण होण्याची कारणे काय?

  1. रशिया-युक्रेन तणाव सुरू असताना आणि अलीकडेच वाढलेल्या वेळी, इस्रायल-इराण संघर्ष हा बाजारांना एक नवीन धक्का आहे.

2.मध्य पूर्वेकडून पुरवठा खंडित होण्याच्या चिंतेमुळे इराण-इस्रायली संघर्ष सुरू झाल्यानंतर डब्ल्यूटीआय क्रूड आणि ब्रेंट क्रूडच्या किमती 10 टक्क्यांहून अधिक वाढल्या.

3.भू-राजकीय तणावामुळे जपानचा निक्केई  1.16 टक्क्यांनी घसरला.

गुंतवणूकदारांना

2 लाख कोटींचे नुकसान

बाजारात गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त घट झाली. गुरुवारी बाजार बंद झाल्यानंतर बीएसई कंपन्यांचे बाजार भांडवल 450,52,928 कोटींवर पोहोचले. तर शुक्रवारी ते 447,48,445.76 कोटी रुपयांवर पोहोचले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article