श्वानामुळे दोन देशांमध्ये युद्ध
अनेक लोकांनी गमाविला होता जीव
इतिहासात अशा अनेक लढाया झाल्या आहेत, ज्याबद्दल कळल्यावर तुम्हाला धक्का बसेल. दोन देशांदरम्यान वेगवेगळ्या कारणांमुळे युद्ध होत असते, ज्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी होत असते. युरोपमधील दोन देशांदरम्यान एका श्वानामुळे भीषण युद्ध झाले होते आणि यात अनेक लोक मारले गेले होते.
ग्रीस अन् बुल्गारियादरम्यान युद्ध
1925 च्या आसपास ग्रीन त्यावेळी यूनान देश होता आणि बुल्गारियासोबत त्याचे तणावपूर्ण संबंध होते. तणावाचे हे वातावरण एका श्वानामुळे युद्धात बदलले होते आणि दोन्ही देश परस्परांना भिडले होते. ग्रीसच्या एका श्वानाने चुकून मॅसेडोनियाची सीमा ओलांडली होती, ज्याला पकडण्यासाठी त्याचा मालक जो ग्रीसच्या सैन्यात शिपाई होता, तो देखील मॅसेडोनियाची सीमा ओलांडून तेथे पोहोचला होता. 1925 च्या आसपास मॅसेडोनियाच्या सीमेचे रक्षण बुल्गारियाचे सैनिक करायचे.बुल्गारियाच्या सैनिकांना ग्रीसचा एक सैनिक मॅसेडोनियाची सीमा ओलांडून आल्याचे कळल्वर त्यांनी कुठलीही खातरजमा न करता त्या सैनिकावर गोळी झाडली होती. यामुळे दोन्ही देशांदरम्यान तणाव वाढला होता. स्वत:च्या सैनिकाच्या मृत्यूमुळे नाराज ग्रीसच्या सरकारने बुल्गारियाच्या सीमेवर हल्ला केला. दोन्ही देशांदरम्यान 18 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर पर्यंत पाच दिवस संघर्ष झाला, ज्यात सुमारे 50 लोक मारले गेले होते.
ग्रीसने दिली भरपाई
युद्ध संपल्यावर दोन्ही देशांदरम्यान करार झाला, ज्यात बुल्गारियाचे जितके नुकसान झाले त्याची भरपाई ग्रीस करून देणार अशी अटक घालण्यात आली. ग्रीसने भरपाईदाखल त्यावेळी 45 हजार पाउंड इतकी रक्कम दिली होती.