वक्फ विधेयक धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात : ममता बॅनर्जी
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे विधेयक संघीय प्रणाली तसेच धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात आहे. हे विधेयक एका विशिष्ट वर्गासाठी आहे. वक्फ विधेयकाद्वारे मुस्लिमांचे अधिकार हिरावून घेतले जात आहेत. केंद्र सरकारने वक्फ विधेयकासंबंधी राज्याशी चर्चा केली नसल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. हे विधेयक वक्फची संपत्ती नष्ट करणार आहे. जर कुठल्याही धर्माला लक्ष्य करण्यात आले तर आम्ही त्याची निंदा करू असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. बांगलादेशच्या मुद्द्यावर बोलताना ममता बॅनर्जी यांनी कुठल्याही धर्माला धक्का बसू नये अशी आमची इच्छा असल्याचे वक्तव्य केले आहे. इस्कॉनसोबत माझे बोलणे झाले आहे. हे एका अन्य देशातील प्रकरण असून केंद्र सरकारने याप्रकणी योग्य पाऊल उचलावे. आम्ही या मुद्द्यावर केंद्र सरकारच्या सोबत आहोत असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.