For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मांजरांच्या घरासाठी हवाय भाडेकरू

07:00 AM Jun 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
मांजरांच्या घरासाठी हवाय भाडेकरू
Advertisement

सध्या एक पोस्ट व्हायरल होत असून यात एका इसमाने पाळीव मांजरांना माणसासारखे संबोधून त्यांच्या वतीने एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये ही मांजरं घरासाठी भाडेकरू शोधत असल्याचे नमूद आहे. या एका खोलीच्या घरात ही मांजर अनोळखी माणसाला सोबत राहण्यासाठी आमंत्रित करत आहेत. परंतु यासाठीचे भाडे ऐकल्यावर धक्काच बसणार आहे. ट्विटर युजरने एक स्क्रीनशॉट शेअर केला असून यात भाडेकरू शोधण्यासाठी पोस्ट लिहिण्यात आली आहे. मांजरांवर प्रचंड प्रेम असलेल्या व्यक्तीने मांजरांच्या वतीने ही पूर्ण पोस्ट लिहिली आहे. हे घर आमचं आहे, परंतु आम्ही ज्या इसमासोबत राहतो, त्याला वाटते आपणच मालक आहोत असे मांजरांच्या वतीने लिहिण्यात आले आहे. हे घर लंडनमध्ये असून एका खोलीच्या घरासाठी भाडेकरू ही मांजरं शोधत आहेत.

Advertisement

मांजरांच्या वतीने लिहिली पोस्ट

आम्ही दोन मांजरं असून ती एक मोठ्या एक बेडरुम असलेल्या ग्राउंड फ्लोअरच्या फ्लॅटमध्ये राहतो, यात खासगी गार्डन आहे. हे ठिकाण लंडनमध्ये अत्यंत चांगल्या लोकेशनवर आहे. आम्ही एका जोडप्यासोबत राहतो, यातील युवती बहुतांशवेळा बाहेरच असते आणि युवक लिव्हिंग रुम कम किचननजीक असलेल्या भागात राहतो, तेथेच तो झोपी जातो. यामुळे आम्ही लिव्हिंग रुम भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे. जो कुणी घरी राहण्यासाठी येईल, त्याला आमच्यासोबत रहावे लागेल असे मांजरांच्या वतीने लिहिण्यात आले. ही मांजर अनेकदा बेडवर येऊन झोपू शकतात. संबंधित घरासाठी विद्यार्थी किंवा प्रोफेशनल भाडेकरूचा शोध घेतला जात आहे. भाडेकरूने मांजरप्रेमी असणे आवश्यक आहे. या घरासाठी 1 हजार पाउंड म्हणजेच 1 लाख रुपयांपेक्षा अधिक मासिक भाडे द्यावे लागणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.