दिवाळीला पार्लरला न जाता झटपट ग्लो हवाय ? मग ट्राय करा हा फेस पॅक
हिंदू संस्कृतीत दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.मात्र दिवाळीत घराची साफसफाई, फराळ तसेच कामांच्या गडबडीत स्वतःकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. शिवाय पार्लरला जाण्यासाठी वेळही नसतो. अशावेळी तुम्हाला जर घरच्या घरी चेहऱ्यावर झटपट चमक हवी असेल तर तुम्हाला आज आम्ही एका फेस पॅक बद्दल सांगणार आहोत. हा फेस पॅक कसा बनवायचा ते जाणून घ्या.
हा फेस पॅक बनविण्यासाठी आपल्याला बेसन,हळद आणि दही या तीन गोष्टी घ्या. यासाठी सर्वप्रथम एका वाटीत एक चमचा बेसन, चिमूटभर हळद आणि २ चमचे दही घ्या. हे सर्व नीट मिक्स करून घ्या. आता ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा. हलक्या हाताने हळू हळू चोळायला सुरुवात करा. यानंतर हा पॅक चेहऱ्यावर आणि मानेवर १५ मिनिटे राहू द्या. आणि चेहरा पाण्याने धुवा.
बेसन, हळद आणि दह्यापासून बनवलेल्या या पॅकमुळे त्वचेवर चमक येते. बेसन हे नैसर्गिक क्लिंजर आहे, टॅनिंगची समस्या दूर होते.तसेच हळद अनेक औषधी गुणधर्म आहेत ज्यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या जसे की मुरुम, सुरकुत्या सन डॅमेज हे टाळते.आणि चेहरा उजळतो. दह्यामुले चेहऱ्यावरील जळजळ कमी करण्यास मदत होते.यामुळे तुम्हीही हा पॅक नक्की वापरून पहा.