For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टी-20 वर्ल्डकपसाठी लंकेचे नेतृत्व वनिंदू हसरंगाकडे

06:00 AM May 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
टी 20 वर्ल्डकपसाठी लंकेचे नेतृत्व वनिंदू हसरंगाकडे
Advertisement

वृत्तसंस्था /कोलंबो

Advertisement

अमेरिका व विंडीजमध्ये होणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषकासाठी गुरुवारी श्रीलंका संघाची घोषणा करण्यात आली. अष्टपैलू वानिंदू हसरंगाकडे संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली असून चरिथ असलांकाकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या मथीशा पथिराना आणि महीश तिक्षणा यासारख्या युवा खेळाडूंना स्थान मिळाले आहे. याशिवाय अनुभवी मॅथ्यूजचीही संघात वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे, आगामी वर्ल्डकपसाठी संघ निवड करताना लंकन बोर्डाने अनुभवी व युवा खेळाडूंचा संघात समतोल साधला आहे.

टी 20 वर्ल्डकपसाठी श्रीलंकन संघ - वनिंदु हसरंगा (कर्णधार), चरिथ असालंका (उपकर्णधार), कुसल मेंडिस, पथुम निसांका, कमिंदु मेंडिस, सदीरा समरविक्रमा, अँजेलो मॅथ्यूज, दसुन शनाका, धनंजय डी सिल्वा, महीश थीक्षाना, वेलालगे, दुष्मंथा चमीरा, नुवान तुषारा, मथीशा पथिराना आणि दिलशान मदुशंका.

Advertisement

Advertisement
Tags :

.