इनरव्हील क्लब बेळगावच्यावतीने वॉकेथॉन
बेळगाव : हिंसा होत असताना ती पाहणे म्हणजे हिंसेचाच एक घटक होणे, हिंसेचे चक्र मोडून काढत, तिचे इनरव्हील क्लब ऑफ बेळगावने शुक्रवारी सकाळी वॉकेथॉनचे संरक्षण करा, तिला सन्मान द्या. बदल आपल्यापासून करा, हिंसेला नाही म्हणा असे हिंसाविरोधी फलक हातात घेऊन इनरव्हील क्लब ऑफ बेळगावने शुक्रवारी सकाळी धर्मवीर संभाजी चौक ते राणी चन्नम्मा सर्कलपर्यंत रॅली काढली. संयुक्त राष्ट्रसंघाने ‘ऑरेंज द वर्ल्ड... स्त्राr विरोधी हिंसा मुक्तीसाठी’ असे घोषवाक्य दिले आहे व त्याबाबत विविध कार्यक्रम करून जनजागृतीचे आवाहन केले आहे. याचाच एक भाग म्हणून इनरव्हील क्लबने शुक्रवारी वॉकेथॉनचे आयोजन केले. महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी यांच्या हस्ते फित कापून व फुगे सोडून वॉकेथॉनचे उद्घाटन करण्यात आले. क्लबच्या अध्यक्षा अपर्णा भटकळ यांनी स्वागत केले. सचिव बेला शिवलकर यांनी वॉकेथॉनचा हेतू सांगितला.
यावेळी महापौरांनी इनरव्हील क्लबने आयोजित केलेल्या वॉकेथॉनचे कौतुक केले.तसेच शहर सुधारणेसाठी आणि शहराच्या विकासासाठी क्लबचा सहभाग असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्लास्टिकमुक्तीसाठी सुद्धा क्लबने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. या वॉकेथॉनमध्ये बालिका आदर्शच्या विद्यार्थिनींनी लाठी व लेझीमचे प्रात्यक्षिक दाखवले. आयएमईआर व सीबाल्कच्या विद्यार्थ्यांनी हिंसेच्या विरोधात पथनाट्या सादर केले. या वॉकेथॉनमध्ये रोटरी क्लब,रोट्रॅक्ट क्लब, इंटरॅक्ट क्लब, इनरव्हील क्लब खानापूर, वेणूग्राम सायकलिंग क्लबचे सदस्य, एम. व्ही. हेरवाडकर, एमव्हीएम इंग्लीश माध्यम शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. वॉकेथॉनमध्ये डिस्ट्रीक्ट आयएसओ शालिनी चौगुले, माजी अध्यक्षा रत्ना बेहरे, लता कित्तूर, इव्हेंट चेअरमन उर्मी शेरेगार यांच्यासह इनरव्हीलच्या सदस्या केशरी पोशाखासह सहभागी झाल्या होत्या.