वाघवडे हायस्कूलच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात
10:57 AM Dec 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वार्ताहर/किणये
Advertisement
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित वाघवडे हायस्कूलच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात झाल्या. अध्यक्षस्थानी एम. टी. आंबोळकर होते. विद्यार्थिनींनी स्वागत गीत व इशस्तवन म्हटले. मुख्याध्यापक भारत पाटील यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. क्रीडा साहित्याची पूजन व उद्घाटन नागेश परीट यांच्या हस्ते करण्यात आले. सुदृढ आरोग्यासाठी व विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी विद्यार्थ्यांनी रोज नियमित व्यायाम करावा. यामुळे खेळांनाही महत्त्व दिले पाहिजे. तसेच उज्वल भविष्यासाठी रोज अभ्यासही नियमित केलाच पाहिजे. असे आंबोळकर यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
Advertisement
Advertisement