For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जयसिंगपुरातील वडार समाजाचा आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांना जाहीर पाठिंबा

07:51 PM Nov 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
जयसिंगपुरातील वडार समाजाचा आमदार डॉ  राजेंद्र पाटील यड्रावकर यांना जाहीर पाठिंबा
Advertisement

जयसिंगपूर :

Advertisement

जयसिंगपूर शहरातील संपूर्ण वडार समाजाने राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांना जाहीर पाठिंबा दिला. समाजाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी घेतलेल्या आमदार यड्रावकर यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धारही यावेळी समाजातील बांधवांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना समाजाचे नेते माजी नगराध्यक्ष गंगाराम माने म्हणाले, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी वडार समाजाच्या सांस्कृतिक हॉल आणि रस्त्यांसाठी जयसिंगपूरच्या इतिहासात नोंद होईल असा तब्बल ७ कोटींचा निधी दिला आहे. समाजातील विद्यार्थी युवक घडले पाहिजेत पारंपारिक व्यवसायात न गुंतता ते सक्षम झाले पाहिजेत यासाठी आमदार यड्रावकर यांनी वेळोवेळी वडर समाजाला साथ दिली आहे. जयसिंगपूरचा पाया असलेल्या संपूर्ण वडार समाजाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी आमदार यड्रावकर यांनी घेतल्याने  संपूर्ण वडार समाज आमदार यड्रावकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, आणि  येत्या निवडणुकीत मोठे मताधिक्य देऊन निवडून आणेल, असा विश्वास यावेळी वडार समाजातील बांधवांनी व्यक्त केला.

Advertisement

यावेळी समाजाचे जेष्ठ नेते राजाराम भोसले, रमेश कलकुटगी, समाजाचे चेअरमन सखाराम नलवडे, माजी नगराध्यक्ष शंकर कलकुटगी, माजी नगराध्यक्ष प्रकाश डोंगरे, महेश कलकुटगी, अर्जुन देशमुख, सचिन डोंगरे, चेअरमन रोहित डोंगरे, चेअरमन गंगाराम माने, वसंत पोवार, परसू धनवडे, विकास नलवडे, संजय कुऱ्हाडे, अनिल माने, आनंदा भोसले,  मारुती नलवडे, तुकाराम साळुंखे, अनिल पोवार, राहुल नलवडे, राजू पोवार, सदाशिव नलवडे, अमोल शिंदे, राजू गाडीवडर, महेश शिंगाडे, चंदू माने, उमेश साळुंखे, अशोक नलवडे, संदीप भोसले, संदीप शिंगाडे, राजू भोसले, अंकुश पोवार, नारायण डोंगरे, आत्माराम शिंगाडे, शिंदे मामा, संदीप पोवार, अशोक भोसले, भिवान्ना शिंगाडे, मनोहर नलवडे, विकास वडर, संजय नलवडे, राजेंद्र आडके, लालू भोसले, आकाश नलवडे, सचिन जाधव, बालाजी पोवार यांच्यासह वडार समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.