For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अगतिक भाजप: वाचाळांपासून वाचवा

06:09 AM Sep 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
अगतिक भाजप  वाचाळांपासून वाचवा
Advertisement

स्वत:ला जगातील सर्वात स्मार्ट समजणारा पक्ष सध्या त्याच्याच स्मार्ट लोकांमुळे अडचणीत आलेला आहे, येत आहे. एकाला चूप केले कि दुसरा सुरु होतो. जणू साखळी स्पर्धाच सुरु आहे. चार राज्यांच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत आणि त्यातील दोन तर जाहीर होऊन प्रचाराला सुरुवात झालेली आहे. अशावेळी भाजपला काय करावे ते कळेनासे झालेले आहे. नरेंद्र मोदी 2014 साली पंतप्रधान झाले तेव्हा भारताला खरे स्वातंत्र्य मिळाले असे म्हणण्राया कंगना रानौत या वाचाळांच्या फौजेत आघाडीवर आहेत. ‘कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे‘ असेच काहीसे वागून त्या जगातील सगळ्यात मोठ्या पक्षाला ठेंगा दाखवत आहेत.

Advertisement

कंगना यांना वारंवार समज दिली गेली अगदी पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांनी देखील ताकीद दिली तरी ‘श्वानपुच्छ नलिकेत घातले तरी ते होईना सरळ‘ असा प्रकार झालेला आहे. कंगना या पक्षाच्या खासमखास मानल्या जातात. ‘क्विन‘ या हिंदी चित्रपटाची बेबाक नायिका म्हणून रसिकांच्या मनावर राज्य करणारी कंगना तिच्या वक्तव्याने भाजपकरता  ‘खलनायीका‘ बनत चालली आहे कि काय असा प्रश्न पडू लागला आहे. कंगना यांनी तोंड उघडले कि वाद निर्माण झालाच अशी  परिस्थिती आहे. कधीकधी त्यांची बाळबोध विधाने देखील करमणुकीस पात्र ठरतात. उदाहरणं म्हणजे: या राहुल गांधींना विरोधी पक्षनेता कोणी बनवले?

गेल्या दहा वर्षात भाजप स्वबळावर सत्तेत होती पण या लोकसभा निवडणूकींत तिला बहुमत न मिळाल्याने परिस्थिती नाजूक आहे अशात कंगना आपल्या वक्तव्यांनी आगी लावत सुटल्याने भाजपची पंचाईत झाली आहे. एकीकडे त्यांनी जातीनिहाय जनगणनेच्या विरुद्ध मत प्रदर्शित केलेले आहे तर दुसरीकडे शेतकरी आंदोलनाबाबत आक्षेपार्ह विधाने केलेली आहेत. त्भाजपच्या या ‘राणी लक्ष्मीबाईला‘ जीभेचे घोडे आवरता येत नसल्याने ती  स्वकियांचेच नुकसान करत आहे.  भाजपमध्ये निष्ठावंत मंडळी तिला आवर घालण्याकरता श्रेष्ठींना साकडे घालत आहेत.

Advertisement

एक भयंकर रागावलेली आणि अव्हेरलेली स्त्राr काय नुकसान करू शकते याचा अंदाज भाजपला स्मृती इराणी यांच्या कृतींमुळे मिळू लागला आहे. अमेठीमधून निवडणूक हारल्यावनंतर भाजप त्यांना अक्षरश; विसरून गेली आहे असे स्पष्ट दिसत होते. त्यांना पक्षातदेखील पद दिले गेले नाही आणि त्यांची विचारपूस देखील केली गेली नाही. त्यांच्याकडून सरकारी बंगला सत्वर खाली करून घेण्यात आला.  आता स्मृतींनी त्यांचे हाडवैरी समजले जाण्राया राहुल गांधी आणि त्यांच्या राजकारणाची स्तुती करून भाजपपुढे अडचण उभी केलेली आहे. राहुल हे एका रणनीतीनुसार काय करत असून त्यांचे राजकारण लक्षणीय पद्धतीचे आहे असे सूचवून मोदी आणि त्यांच्या समर्थकांना कानपिचक्या देण्याचे काम त्यांनी केलेले आहे. भरवशाच्या म्हशीला टोणगा असाच हा प्रकार झालेला आहे. थोडक्यात काय तर काही भरीव मिळाल्याशिवाय स्मृती शांत होणार नाहीत. भाजपने त्यांना विस्मृतीत टाकले तरी त्या तसे होऊन देणार नाहीत.  कंगना म्हणजे भाजपची स्मृतींची संसदेतील रिप्लेसमेंट म्हणून मानले जात होते. पक्षाध्यक्ष न•ा यांना मंत्रीमंडळात घेण्याची मजबुरी नसती तर कंगना कॅबिनेटमध्ये दिसल्या असत्या. अनुराग ठाकूर आत्तासारखेच बाहेर ठेवले गेले असते.

कंगना आणि स्मृती थोड्या शांत झाल्या असताना भाजपचे वादग्रस्त माजी खासदार आणि भारतीय कुस्तीगीर परिषदेचे माजी अध्यक्ष ब्रज भूषण शरण सिंग हे हे अचानक बोलते झालेले आहेत. गृह मंत्री अमित शहा यांचा वरदहस्त लाभल्याने ते राजकारणात तरले आहेत. उत्तरप्रदेशच्या राजकारणात योगी आदित्यनाथ यांच्याविरुद्ध एक ठाकूर नेता पाहिजे असल्याने कितीही वादात अडकले असले तरी सिंग यांचे दिल्ली दरबारी वजन कमी झालेले नाही.  पण ब्रज भूषणाने गेल्या आठवड्यात ऑलिम्पिक महिला कुस्तीगीर विनेश फोगट यांनी काँग्रेसमध्ये सामील होऊन हरियाणा विधानसभेच्या निवडणूकांच्या फडात उतरल्यावर जे काही तारे तोडले आहेत त्याने आधीच अडचणीत सापडलेल्या भाजपाला राज्यात अजूनच संकटात आणलेले आहे.

जर कंगना आणि स्मृती यांच्या वक्तव्यांनी भाजप अडचणीत येत आहे तर पक्षाशी अर्थाअर्थी काहीही संबंध नसलेल्या सेबीच्या वादग्रस्त अध्यक्ष माधबी बूच यांच्या मौन धारणाने सत्ताधारी अडचणीत येत आहेत. माधबी यांनी केलेले कथित घोटाळे जवळजवळ दररोज बाहेर काढण्याचे काम काँग्रेसने चालवले असले तरी त्यांनी तसेच अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी पाळलेली चुप्पी या वादाला जोरदार हवा देत आहे.बुच यांनी राजीनामा द्यावा  अशी मागणी गैर-राजकीय क्षेत्रात देखील वाढीस लागलेली असताना सरकार बघ्याची भूमिका घेऊन अदानी घोटाळ्याला खतपाणी घालत आहे. बुच यांचा बोलविता धनी कोण? ही मोहीम दिवसेंदिवस प्रभावी होत आहे आणि सरकारला अडचणीत आणत आहे. देशातील भांडवली बाजारावर त्याचा परिणाम झाला तर मोदींना ते फार महागात पडणार आहे हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. बुच यांच्यामुळे अदानी घोटाळ्यावर परत एकदा फोकस आलेला आहे. हे प्रकरण जेव्हढे महाराष्ट्रातील किरीट सोमय्या हे वाचाळांच्या यादीत रूढार्थाने नसले तरी भाजपच्या निवडणूक प्रचार समितीचा संयोजक पदाचा मान धुडकावून देऊन त्यांनी अप्रत्यक्षपणे मोदी तसेच अमित शहा यांनाच लक्ष्य केलेले आहे असे मानले जाते. शंभर असंतुष्ट जे काम करू शकले नसते ते एकट्या सोमैयांनी केलेले आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यांचा लेटरबॉम्ब भाजपला भारी पडणार आहे. अजित पवार असोत वा उद्धव ठाकरे आणि परिवार यांना पक्षाकरिता अंगावर घेणारे किरीटभाई गेल्या पाच-सहा वर्षात आप्ल्यायला साधे राज्य सभा सदस्यदेखील बनवले गेले म्हणून नाराज आहेत असे मानले जाते.

सोमय्या यांचे बंड महा युतीला फार महागात पडू शकते. ते भाजपला अवघड जागेचे दुखणे झालेले आहेत. गेली काही वर्षे भाजपमधील प्रमुख असंतुष्ट म्हणून पुढे आलेले सुब्रमण्यम स्वामी हे आता मोदींची प्रतिमा भंजन करण्याच्या कामाला जोरदारपणे लागले आहेत असे त्यांच्या यूट्यूब वरील मुलाखती तसेच सोशल मीडिया पोस्टवरून दिसत आहे. अब्रह्मण्यम प्रकारचे हे काम असले तरी प्रखर मोदी समर्थक देखील स्वामी यांचा प्रतिवाद करताना दिसत नाहीत हे अजब आहे. या सगळ्या वातावरणात पंतप्रधान हे अजूनही प्रचाराकरिता म्हणावे तसे बाहेर पडलेले नाहीत त्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आलेले आहे.  लोकसभा निवडणुकीत विक्रमी प्रचार करणारे भाजपचे स्टार प्रचारक हात गाळून का बरे बसले आहेत? असे प्रश्न विचारले जात आहेत. जिथे निवडणूक आहे ती राज्ये पिंजून काढण्याऐवजी मोदींनी परदेशी भेटींचा लावलेला सपाटा अनाकलनीय आहे. भाजपने कितीही टीकेची झोड उठवलेली असली तरी अमेरिकेत राहुल गांधी यांनी केलेली भाषणे ही काँग्रेसला मदत करताना दिसत आहेत. राहुल गांधी यांचा ब्रँड मजबूत करण्याचे काम भाजपने चालवले आहे असे काही राजकीय निरीक्षक मानत आहेत. थोडक्यात काय येत्या आठवड्यात आपला वाढदिवस साजरी करीत असलेल्या मोदींना पुढील मार्गक्रमणा करण्याअगोदर खूपच गहन चिंतनाची आवश्यकता आहे. दिवसेंदिवस काळ कठीण होत चालला आहे.

सुनील गाताडे

Advertisement
Tags :

.