महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फेरफार रोखण्यासाठी व्हीटीयूची नवीन गुणपत्रिका

06:18 AM Aug 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

क्यूआर कोडसह 15 सुरक्षा उपायांचा समावेश

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

गुणपत्रिकांमधील फेरफार टाळण्यासाठी व्हीटीयूने नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले आहे. गुणपत्रिका व दीक्षांत प्रमाणपत्रांची नक्कल व फेरफार टाळण्यासाठी क्यूआर कोडसह 15 सुरक्षा उपायांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे प्रमाणपत्रांमध्ये फेरफार करून गुण वाढवणे, तसेच नकली प्रमाणपत्र तयार करणे याला आळा घालणे शक्य होणार आहे.

कर्नाटकात व्हीटीयू अंतर्गत 215 इंजिनिअरिंग, एमटेक, एमबीए कॉलेज आहेत. दरवर्षी दीक्षांत सोहळ्यात 80 हजार ते 1 लाख विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण केले जाते. परंतु काहीजणांनी नोकरी मिळविण्यासाठी फेरफार केलेली गुणपत्रिका सादर केल्याची माहिती व्हीटीयूकडे आली होती. तसेच गुणपत्रिकांची तपासणी करण्याचे अधिकचे काम संस्थांकडून व्हीटीयूला वारंवार लागत होते.

यावर उपाय म्हणून गुणपत्रिका व दीक्षांत सोहळ्याच्या पदवीदान प्रमाणपत्रावर क्यूआर कोड उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे प्रमाणपत्राची नक्कल करणे शक्य होणार नाही. तसेच प्रमाणपत्र लवकर खराब होऊ नयेत याचीही व्यवस्था नव्या प्रमाणपत्रात करण्यात आली आहे.

कोणत्या प्रकारची सुरक्षा...

हायरेझ्युलेशन बॉर्डर, फाईल स्टॅम्पिंग, नंबरींग, प्रिझमेंटिंग प्रिंटिंग, मायक्रोलाईन प्रिंटिंग, सिम्युलेटेड वॉटर मार्क, नावीन्यपूर्ण इंक यासह 15 सुरक्षा उपायांचा वापर नव्या गुणपत्रिकांमध्ये करण्यात आला आहे. पहिल्यांदाच असा सुरक्षा उपाय करण्यात आल्याने भविष्यात इतर विद्यापीठांमध्येही अशा गुणपत्रिका देण्याबाबत विचार केला जाण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article