For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्हीटीयूचा दीक्षांत सोहळा गुरुवारी

12:32 PM Jul 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
व्हीटीयूचा दीक्षांत सोहळा गुरुवारी
Advertisement

राज्यपालांची उपस्थिती, तिघांना मानद डॉक्टरेट

Advertisement

प्रतिनिधी / बेळगाव

विश्वेश्वरय्या टेक्नीकल युनिर्व्हसिटी (व्हीटीयू)चा 24 वा दीक्षांत समारंभ गुरूवार दि. 18 रोजी होणार आहे. सकाळी 11.30 वाजता डॉ. एपीजे अब्दुल कलाम सभागृहात हा सोहळा होईल. या कार्यक्रमाला राज्यपाल थावरचंद गेहलोत व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे संचालक प्रा. गोविंद्न रंगराजन यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. एस. विद्याशंकर यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

Advertisement

यावर्षी 51 हजार 129 विद्यार्थ्यांनी बाई व बीटेक मिळविली आहे. तर 1 हजार 138 विद्यार्थ्यांनी बी आर्च, 8 विद्यार्थ्यांनी बी प्लॅन तर 340 विद्यार्थ्यांनी पीएचडी मिळविली आहे. चिक्कबळ्ळापूर येथील मधुसूदन साई इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्सेसचे संस्थापक मधुसूदन साई, इस्त्राsचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ, बेंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक व सीईओ हरी के. मुरार यांना मानद डॉक्टरेट देवून सन्मानित करण्यात येणार आहे.

परीक्षा झालेल्या तीन तासात विद्यापीठाने निकाल देवून देशात इतिहास घडविला. त्याचपद्धतीने आणखी एक प्रयत्न करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होण्यासाठी 50 हून अधिक अमेरीकन कंपन्या व्हिटीयूशी सलग्न करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी व्हीटीयू नेहमीच अग्रेसर राहील, असा विश्वास प्रा. टी. एस. श्रीनिवास व प्रा. बी. . रंगास्वामी यांनी व्यक्त केला.

केएलईच्या विद्यार्थ्याला 12 सुवर्ण

यावर्षी बेंगळूर, मंगळूर यांना मागे सारत बेळगावच्या विद्यार्थ्याने तब्बल 12 सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. केएलई डॉ. एम. एस. शेषगिरी कॉलेजचा विद्यार्थी साहिल एम. सोमनाचे याने सिव्हील इंजिनिअगरींग विभागात 12 सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. बेंगळूर इन्सिट्यूट ऑफ टेक्नालॉजीची विद्यार्थीनी जी. विष्णूप्रिया हिला 7 सुवर्णपदक देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Advertisement
Tags :

.