For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘द हंड्रेड’मधून वोक्सची माघार

06:25 AM Aug 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘द हंड्रेड’मधून वोक्सची माघार
Advertisement

वृत्तसंस्था/लंडन

Advertisement

कर्णधार बेन स्टोक्सच्या दुखापतीनंतर आता इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सने इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या ‘द हंड्रेड’ या स्पर्धेतून माघार घेतली आहे. इंग्लंड आणि लंका यांच्यात 21 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी उपलब्ध रहावा यासाठी वोक्सला ईसीबीने स्पर्धेतून माघारी बोलावले आहे.

इंग्लंडमध्ये सध्या द हंड्रेड ही क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. बर्मिंगहॅममध्ये फिनिक्स या संघातून खेळणाऱ्या 35 वर्षीय वोक्सने प्राथमिक गटातील शेवटच्या दोन सामन्यामध्ये खेळण्याचे ठरविले होते. पण आता तो या स्पर्धेतील उर्वरित सामन्यांसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही, असे बर्मिंगहॅमच्या फिनिक्स क्लबच्या व्यवस्थापन समितीकडून सांगण्यात आले. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला  रविवारी या स्पर्धेतील सामन्यात खेळताना धोंडशिरेची दुखापत झाली होती. त्यामुळे तो लंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळण्याबाबत अद्याप साशंकता निर्माण झाली आहे. इंग्लंड आणि लंका यांच्यातील पहिली कसोटी मँचेस्टर येथे 21 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. अलिकडेच झालेल्या विंडीज विरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने एकतर्फी विजय मिळविला होता. या विजयामुळे इंग्लंडचा संघ विश्व कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या गुणतक्यात सहाव्या स्थानावर आहे. इंग्लंड आणि लंका यांच्यातील दुसरी कसोटी 21 ऑगस्टपासून लॉस मैदानावर तर तिसरी कसोटी 6 सप्टेंबरपासून ओव्हल मैदानावर खेळविली जाईल. यानंतर उभय संघात टी-20 मालिका होणार आहे.

Advertisement

इंग्लंड संघ: स्टोक्स (कर्णधार), अॅटकिन्सन, शोएब बशीर, हॅरी ब्रुक, जॉर्डन कॉक्स, डकेट, लॉरेन्स, पॉप, पॉटस, रुट, स्मिथ, स्टोन, वोक्स, वूड.

Advertisement
Tags :

.