महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

झारखंडमध्ये 38जागांसाठी उद्या मतदान

06:52 AM Nov 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विधानसभा निवडणूक जाहीर प्रचार समाप्त : 528 उमेदवार रिंगणात

Advertisement

वृत्तसंस्था/ रांची

Advertisement

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात बुधवार, 20 नोव्हेंबरला 12 जिल्ह्यांमधील 38 विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठीच्या प्रचारतोफा सोमवारी थंडावल्या असून आता मंगळवार हा एक दिवस उमेदवारांना केवळ घरोघरी प्रचार करता येणार आहे. प्रचाराच्या काळात सर्वच पक्ष आणि उमेदवारांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली. दुसऱ्या टप्प्यात एकूण 528 उमेदवार रिंगणात आहेत.

झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यातील 38 जागांसाठी एकूण 528 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने 32 उमेदवार उभे केले आहेत. तर बसपने 24, झारखंड मुक्ती मोर्चाने 20, काँग्रेसचे 12, आजसूचे 6 आणि राजदने 2 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. विविध राजकीय पक्षांनी दिलेल्या तिकिटांमध्ये गुन्हेगारी प्रतिमा असलेल्या उमेदवारांची संख्याही एडीआरच्या अहवालात स्पष्ट करण्यात आली आहे. एडीआरने आपल्या अहवालात 522 उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लषण केले आहे. एकूण उमेदवारांपैकी 148 उमेदवारांवर (28 टक्के) फौजदारी गुन्हे नोंद आहेत. यापैकी 122 उमेदवारांवर (23 टक्के) गंभीर गुन्हे दाखल आहेत.

दुसऱ्या टप्प्यात 12 जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. यामध्ये धनबाद, बोकारो, दुमका, पाकूर, गिरिडीह, साहिबगंज, कोडरमा, देवघर, जामतारा, रामगढ, रांची आणि हजारीबाग जिल्ह्यांचा समावेश आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून चोख नियोजन करण्यात आले आहे. प्रशासकीय यंत्रणा मतदानाची तयारी करत आहे. मतदानासाठी 9,938 शालेय इमारतींमध्ये एकूण 14,218 बूथ तयार करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वसाधारण बूथची संख्या 7,390 आहे. त्याचबरोबर नक्षलग्रस्त भागात 900 बूथ असून या सर्व ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्याची तयारी सुरक्षा यंत्रणांकडून करण्यात आली आहे.

संवेदनशील बूथची संख्या 7 हजार

दुसऱ्या टप्प्यात संवेदनशील बूथची संख्या सुमारे 7,000 आहे. सध्या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये फक्त गिरिडीह आणि बोकारोचा समावेश आहे. गिरिडीहमध्ये 350 आणि बोकारोमध्ये 180 बूथ नक्षलग्रस्त मानले जातात. दुसऱ्या टप्प्यात केंद्रीय निमलष्करी दलाच्या 585 कंपन्या आणि जेएपीच्या 60 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर जिल्हा दल आणि होमगार्डचे सुमारे 30 हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय नक्षलग्रस्त भागातील बूथवर कोब्रा आणि एसटीएफचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. काही दुर्गम भागात मतदान पक्ष हेलिकॉप्टरने पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

दुसरा टप्पा दृष्टिक्षेप...

एकूण मतदारसंघ 38

एकूण उमेदवार      528

एकूण मतदान केंद्रे        14,218

मतदान इमारती   9,938

सामान्य मतदान केंद्रे  7,390

संवेदनशील केंद्रे    7,000

नक्षलप्रवण क्षेत्रातील केंद्र    900

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article