कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ब्रिटनमध्ये आता 16व्या वर्षी मताधिकार

07:00 AM Jul 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तब्बल 56 वर्षांनंतर निवडणूक व्यवस्थेत बदल : परकीय हस्तक्षेप रोखण्यासाठी नियम बदलले

Advertisement

वृत्तसंस्था/लंडन

Advertisement

ब्रिटनमध्ये मतदान करण्याचे किमान वय आता 18 वरून 16 वर्षे करण्यात आले आहे. आता 16 आणि 17 वर्षीय नागरिक पुढील सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करू शकतील, असे सरकारने जाहीर केले आहे. ब्रिटनमध्ये यापूर्वी 1969 मध्ये मतदानाचे वय 21 वरून 18 वर्षे करण्यात आले होते. तथापि, 16-17 वर्षीय नागरिक फक्त स्कॉटलंड आणि वेल्समधील काही निवडणुकांमध्ये मतदान करू शकत होते, परंतु आता ते संपूर्ण ब्रिटनमध्ये स्थानिक, प्रादेशिक आणि सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाग घेऊ शकतील. या निर्णयामुळे गेल्यावर्षी निवडणुकीपूर्वी लेबर पार्टीने आपल्या जाहीरनाम्यात दिलेले वचन देखील पूर्ण केले आहे.

ब्रिटिश सरकारने निवडणूक नियमावली बदल करताना मतदारांच्या वयासोबतच आणखी एक नवीन नियम बनवला आहे. नव्या नियमांतर्गत आता कोणताही राजकीय पक्ष परदेशातून 500 पौंड (सुमारे 58,000 रुपये) पेक्षा जास्त देणगी घेऊ शकणार नाही. एलोन मस्कसारखे परदेशी अब्जाधीश पैशाच्या माध्यमातून ब्रिटनच्या राजकारणावर आणि निवडणुकांवर प्रभाव टाकू नये यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

ब्रिटन सरकारने युवा किंवा तरुण वर्गाला न्याय देण्यासाठी आणि लोकशाहीमध्ये त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी मतदारांचे वय कमी करण्याचे पाऊल उचलले आहे. या बदलासोबतच सरकार मतदार ओळखपत्र प्रणालीतही बदल करत आहे. आता डिजिटल ड्रायव्हिंग लायसन्स, बँक पासबुकचा वापर मतदार ओळखपत्र म्हणूनही करता येईल. या माध्यमातून देशाच्या निवडणूक व्यवस्थेवर जनतेचा विश्वास दृढ होण्यास मदत होईल.

95 लाख तरुणांना लाभ

मतदार होण्यासाठीची वयोमर्यादा कमी केल्यामुळे ब्रिटनमधील 95 लाख तरुणांना फायदा होईल. सध्या ब्रिटनमध्ये सुमारे 4 कोटी 82 लाख नोंदणीकृत मतदार आहेत. लोकांचा लोकशाही आणि सरकारी संस्थांवरील विश्वास बऱ्याच काळापासून कमी होत चालल्यामुळे आता तो बदलण्याची वेळ आली आहे, असे उपपंतप्रधान अँजेला रेनर म्हणाल्या. 16 वर्षांच्या तरुणांना मतदानाचा अधिकार दिल्याने केवळ लोकशाही सहभाग वाढणार नाही तर भविष्यासाठी समाजही मजबूत होईल, असा दावाही त्यांनी केला. तथापि, काही विरोधी नेत्यांनी चिंता व्यक्त करत यामुळे मतदान प्रक्रियेची सुरक्षितता कमकुवत होऊ शकते असे म्हटले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article