महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सहाव्या टप्प्यात आज 58 जागांवर मतदान

06:50 AM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मनोज तिवारी, कन्हैया कुमार, मनेका गांधी, नवीन जिंदाल यांच्यासह 889 उमेदवार रिंगणात

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

2024 लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात शनिवार, 25 मे रोजी 7 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशातील 58 जागांवर मतदान होणार आहे. जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग-राजौरी मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात होणारे मतदान पुढे ढकलल्यामुळे तेथे आता सहाव्या टप्प्यात मतदान होत आहे.

सहाव्या टप्प्यात 889 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये 797 पुऊष आणि 92 महिला उमेदवार आहेत. यामध्ये 3 केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, कृष्ण पाल सिंग गुर्जर आणि राव इंद्रजित सिंग हे रिंगणात आहेत. तसेच तीन माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, मनोहरलाल खट्टर आणि जगदंबिका पाल हेदेखील निवडणूक लढवत आहेत. याशिवाय मनोज तिवारी, मनेका गांधी, नवीन जिंदाल, बांसुरी स्वराज, संबित पात्रा, राज बब्बर, निरहुआ आदी बडे नेतेही आपले राजकीय नशीब आजमावत आहेत.

 

हरियाणाच्या कुऊक्षेत्र मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नवीन जिंदाल हे या टप्प्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांच्याकडे 1,241 कोटी ऊपयांची मालमत्ता आहे. लोकसभेच्या 543 जागांपैकी पाचव्या टप्प्यापर्यंत 429 जागांवर मतदान झाले आहे. 25 मे पर्यंत एकूण 487 जागांवर मतदान पूर्ण होईल. त्यानंतर शेवटच्या म्हणजेच सातव्या टप्प्यात 1 जून रोजी 57 जागांवर मतदान होणार आहे.

शनिवारी मतदान होणाऱ्या क्षेत्रांमध्ये बिहारमधील 8 जागा, हरियाणातील सर्व 10 जागा, जम्मू-काश्मीरमधील 1 जागा, झारखंडमधील 4, दिल्लीतील सर्व 7 जागा, ओडिशातील 6, उत्तर प्रदेशातील 14 आणि पश्चिम बंगालमधील 8 जागांचा समावेश आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्याशिवाय ओडिशातील संबलपूर, केओंझार, ढेंकनाल, पुरी, भुवनेश्वर आणि कटक लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या 42 विधानसभा मतदारसंघांमध्ये शनिवारी सार्वत्रिक निवडणुकांबरोबरच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे.

एडीआरच्या अहवालानुसार, सहाव्या टप्प्यात निवडणूक रिंगणात उतरलेल्यांपैकी 183 उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. तसेच 141 उमेदवारांवर खून, अपहरण असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 12 उमेदवार कोणत्या ना कोणत्या प्रकरणात दोषी ठरले आहेत. 6 उमेदवारांवर खुनाचे आणि 21 खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत. 24 उमेदवारांवर महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी 16 उमेदवारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article