For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काकती येथे सायकल फेरीद्वारे मतदान जनजागृती

10:20 AM Apr 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
काकती येथे सायकल फेरीद्वारे मतदान जनजागृती
Advertisement

वार्ताहर /काकती

Advertisement

मतदान करणे हे प्रत्येक भारतीयाचे आद्यकर्तव्य आहे. लोकशाहीत मतदानाला प्रथम महत्त्व असून देशाचे भवितव्य ठरविते. मतदान सक्तीचे केल्याने संविधानातील इच्छा पूर्ण होतात. म्हणून प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन ता. पं. अधिकारी रामरे•ाr यांनी केले. काकती येथील सरकारी शाळेच्या पटांगणात मतदान जनजागृती सायकल फेरी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. जिल्हा प्रशासन, जि. पं., ता. पं., काकती ग्रा. पं. यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमात पीडीओ नाथबुवा यांनी स्वागत करून प्रस्तावना केली. रामरे•ाr  पुढे म्हणाले, संविधानात मतदानाची तरतूद असलेला जगातील सर्वात मोठा आपला लोकशाही देश आहे. संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार हा प्रत्येक भारतीयांचा सन्मान आहे. निवडणूक आयोगाला प्रत्येक मतदान केंद्रावर 100 टक्के मतदान हवे आहे. निवडणुकीच्या दिवशी 18 वर्षावरील सर्वांनी मतदान करावे, अशी भावनिक इच्छा प्रकट केली. त्यानंतर तालुका पंचायत राज साहाय्यक संचालक राजेंद्र मोरबाद यांनी ग्रामीण भागातील मतदाराने सक्तीने सहभागी होऊन मतदान करावे. मतदान केंद्रावर सर्व मूलभूत सुविधा, महिलांसाठी विशेष मतदान केंद्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा, मतिमंद, दिव्यांगांनी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता मतदानात सहभागी व्हावे, असे प्रतिपादन केले. देसाई गल्लीतून निघालेल्या सायकल फेरीत सुमारे 150 तरुण सहभागी हाते. राष्ट्रीय महामार्गावरून होनग्याला जाताना रस्त्यावरील वाहनचालकांना मतदानाचे प्रबोधन करून मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी होनगा ग्रा. पं. पीडीओ गंगाधर एम., आयईसीचे व्यवस्थापक महेश भजंत्री, नरेगाचे टी. सी. नागराज, काकती ग्रा. पं. अध्यक्षा वर्षा मुचंडीकर, होनगा ग्रा. पं. अध्यक्षा जिजाबाई धुडूम, सदस्य, अंगणवाडी, आशा कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.

Advertisement
Advertisement
Tags :

.