महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जिल्हा प्रशासनातर्फे मतदान जागृती

11:05 AM May 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : जिल्हा प्रशासनातर्फे मतदान जागृती अभियान जोमाने राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून मंगळवारी सकाळी सरदार्स हायस्कूलच्या मैदानावर हॉट एअर बलून उडविण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते मतदान जागृती करणाऱ्या मुखवट्यांचे अनावरण करण्यात आले.  याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, चिकोडी आणि बेळगाव लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान होणार आहे. सर्वांनी सक्तीने मतदानात सहभागी व्हावे. मतदारांना आणखी माहिती देण्यासाठी स्वीप कार्यक्रमांतर्गत हॉट एअर बलून उडविण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.जिल्हा पंचायतीचे सीईओ राहुल शिंदे म्हणाले, राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयातील शौर्यचा (वाघ) वापर मतदान जागृती मास्कसाठी करण्यात आला आहे. कोणीही मतदानापासून अलिप्त राहू नये, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी महानगरपालिका आयुक्त पी. एन. लोकेश, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, जि. पं. मुख्य योजना अधिकारी गंगाधर दिवटर, मुख्य लेखा अधिकारी परशुराम दुडगुंटी यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article