For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वत:च्या विकासासाठी उद्योगाशिवाय पर्याय नाही - अनंत मंडगी

06:46 AM Sep 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्वत च्या विकासासाठी उद्योगाशिवाय पर्याय नाही   अनंत मंडगी
Advertisement

आयएमईआरचा स्थापना दिन साजरा

Advertisement

► प्रतिनिधी/ बेळगाव

स्वत:ची प्रगती करायची असेल तर उद्योगाशिवाय पर्याय नाही. उद्योग करण्यासाठी केवळ शिक्षण असून चालत नाही तर खडतर मेहनत गरजेची असते. विद्यार्थ्यांनी आतापासूनच इतरांशी तुलना करण्यापेक्षा आपला व्यवसाय, उद्योग कसा सुरू करता येईल यासाठी प्रयत्न करावेत. व्यवसाय करताना कोणतीही लाज न बाळगता पूर्ण क्षमतेने उद्योगात उतरा, असे प्रतिपादन केएलएस सोसायटीचे चेअरमन अनंत मंडगी यांनी केले.

Advertisement

कर्नाटक लॉ सोसायटीच्या आयएमईआरचा 34 वा स्थापना दिन शनिवारी आयएमईआर सभागृहात पार पडला. या कार्यक्रमात अॅड. अनंत मंडगी बोलत होते. व्यासपीठावर उद्योजक व क्वॉलिटी अॅनिमल फिड्सचे संचालक संजीव देशपांडे, सेक्रेटरी एस. व्ही. गणाचारी, संचालक प्रदीप सावकार, इंदूर येथील प्रेस्टिज विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजेंद्र नरगुंदकर, विवेक कुलकर्णी, आर. एस. मुतालिक, संचालक आरिफ शेख उपस्थित होते. स्थापना दिनानिमित्त बेळगावमधील उद्योजक संजीव देशपांडे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

कुलगुरु डॉ. राजेंद्र नरगुंदकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत नवउद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्य या विषयी माहिती दिली. मार्केटिंग, सेल्स यासाठी प्रत्यक्ष ग्राहकाशी संपर्क ठेवावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनीही सर्व कौशल्ये आत्मसात करावीत, असे त्यांनी सांगितले.

सत्काराला उत्तर देताना उद्योजक संजीव देशपांडे म्हणाले, कोणताही उद्योग अथवा व्यवसाय असो आव्हाने असणारच. प्रत्येक आव्हानाला तोंड देत व्यवसाय पुढे न्यावा लागतो. बर्ड फ्लू, कोरोना यासारख्या आजारांमुळे पोल्ट्री व्यवसाय पूर्णपणे लयाला गेला. परंतु त्यानंतरही खंबीरपणे उभे राहिल्यामुळेच आज 600 कोटींचा व्यवसाय क्वॉलिटी अॅनिमल फिड्सने केला. स्वप्ने पाहण्यात कोणताच अडथळा नसतो आणि ती साकारण्यासाठी पूर्णत: प्रयत्न केल्यास यश मिळणारच ही खात्री बाळगा, असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

प्रारंभी रावसाहेब गोगटे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. रक्षिता कोटेमाने हिने स्वागतगीत सादर केले. कॉलेजच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन आर. एस. मुतालिक यांनी प्रास्ताविक केले. डॉ. आरिफ शेख यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रा. सुमंत देसाई यांनी आभार मानले.

Advertisement
Tags :

.