For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वृद्ध, दिव्यांग, अंध मतदारांची मते पेटीबंद

11:33 AM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
वृद्ध  दिव्यांग  अंध मतदारांची मते पेटीबंद
Advertisement

बेळगाव : दक्षिण व उत्तर मतदारसंघामध्ये लोकसभेसाठी पोस्टल मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. गुरुवार व शुक्रवार हे दोन दिवस घरोघरी जावून मतदान करून घेण्यात आले आहे. त्या सर्व पेट्या महानगरपालिकेच्या कार्यालयात आणण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी एकूण मतदान किती झाले तसेच इतर कागदपत्रांची जमवाजमव सायंकाळपर्यंत सुरू होते. वृद्ध, दिव्यांग आणि अंध मतदारांची मते घेण्यासाठी गुरुवारपासून प्रारंभ झाला होता. दोन दिवस ही मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. याबाबत महानगरपालिकेमध्ये सेक्टर अधिकारी, पीआरओ, एपीआरओ आणि कर्मचाऱ्यांना घरोघरी जावून या सर्वांची मते पेटीबंद करण्यात आली आहेत. एकूण मतदान किती झाले याबाबत मात्र आकडा सांगण्यात आला नाही. असे असले तरी प्रत्येक पथकाने 46 ते 52 मते नोंदवून घेतली आहेत. त्यानंतर या सर्व पेट्या महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आणून ठेवण्यात आल्या आहेत. गुरुवारी सकाळपासूनच या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली होती. सलग दोन दिवस दक्षिण व उत्तर मतदारसंघामध्ये घरोघरी जावून वृद्ध, दिव्यांग, अंध मतदारांची मते पेटीबंद करण्यात आली आहेत. सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत घरोघरी जावून ही प्रक्रिया राबविण्यात आली.

Advertisement

Advertisement
Tags :

.