महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आश्वासनांची पूर्तता जाणण्याचा मतदारांना अधिकार

06:17 AM Feb 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

दिलेल्या आश्वासनांची पूर्तता राजकीय पक्ष कशी करणार आहेत, हे जाणून घेण्याचा प्रत्येक मतदाराला अधिकार आहे, असे महत्वपूर्ण विधान मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केले आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तथापि, हा मतदारांचा अधिकार असल्याचे स्पष्ट आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. ते लोकसभा निवडणुकीच्या सज्जतेला आढावा घेण्यासाठी तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. राजकीय पक्षांनी नंतर अर्थव्यवस्थेला डोईजड ठरतील अशी आश्वासने देण्यापासून स्वत:ला रोखावे, अशी अनेक तज्ञांनी सूचना केली आहे, ही बाब त्यांनी अधोरेखित केली आहे.

Advertisement

आपल्या निवडणूक घोषणापत्रांमध्ये मतदारांना आश्वासने देण्याचा अधिकार राजकीय पक्षांना निश्चितच आहे. तथापि, ही आश्वासने पूर्ण करण्याची अर्थव्यवस्थेची क्षमता आहे का, तसेच राजकीय पक्ष नेमक्या कोणत्या पद्धतीने ही आश्वासने पूर्ण करु शकणार आहेत, हे निवडणुकीआधी जाणून घेण्याचा अधिकार मतदारांनाही आहे. या दोन्ही अधिकारांचे संरक्षण होण्यासाठी एक मध्यममार्ग शोधणे आवश्यक आहे. सध्या यासंबंधीच्या याचिकांवर न्यायालयात सुनावणी होत असल्याने योग्य वेळी न्यायालय आपला निर्णय देईलच. त्यामुळे सध्या केंद्रीय निवडणूक आयोग यावर सविस्तर बोलणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article