महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मतदारयादी उजळणी मोहीम सुरू

02:39 PM Oct 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : भारतीय निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार 1 जानेवारी 2025 ही मतदार पात्र तारीख ठरवून गोवा राज्यातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या संदर्भात मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येईल, असे राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे. त्यामुळे मतदारयादी विशेष उजळणी मोहीम निश्चित केली आहे. विशेष मतदारयादी उजळणी कार्यक्रमानुसार प्रारूप मतदारयादीचे प्रकाशन 29 ऑक्टोबर 2024 रोजी झाले. मतदार यादीसंबंधी कोणतेही दावे आणि हरकती दाखल करण्याचा कालावधी 29 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे.  राज्यात 9, 10, 23 आणि 24 नोव्हेंबर 2024 रोजी विशेष मोहीम होईल.

Advertisement

दावे किंवा आक्षेप असल्यास ते 24 डिसेंबर 2024 पर्यंत  निकालात काढण्यात येतील. 6 जानेवारी 2025 रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होईल. मतदारयादी आणि राजकीय पक्षांना मतदारयादी तपासण्यासाठी  29 ऑक्टोबर 2024 ते 28 नोव्हेंबर 2024 पर्यंत संबंधित मतदान केंद्र, संबंधित निर्वाचन अधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात उपलब्ध असेल. मतदारांनी यादीतील आपल्या नावाची तपासणी करावी आणि दुरूस्ती करावयाची असल्यास तसा अर्ज भरून दुरूस्ती करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या मतदार हेल्पलाईन मोबाईल अॅप आणि https://voters.eci.gov.in/ वर ऑनलाईन ईसेवा उपलब्ध आहे. तसेच मुख्य निर्वाचन अधिकारी, गोवा  यांच्याकडे www.ceogoa.nic.in या वेबसाईटवरून अर्ज करू शकतात.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article