For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाळवा तालुक्याच्या विकासासाठी मताधिक्य द्यावे : खास . धैर्यशील माने

07:43 PM Apr 25, 2024 IST | Abhijeet Khandekar
वाळवा तालुक्याच्या विकासासाठी मताधिक्य द्यावे   खास   धैर्यशील माने
MP Mane
Advertisement

किल्ले मच्छिंद्रगड /प्रतिनिधी

येडेमच्छिंद्र ही क्रांतीची भूमी आहे. इथे दिलेला प्रत्येक शब्द हे माझे वचन असुन भविष्यकाळात तालुक्यातील प्रत्येक भागांत विकासा कामे पोहचवण्या साठी मी कटिबद्ध आहे . तरी वाळवा तालुक्याने मताधिक्य देण्याचे आवाहन खास. धैर्यशील माने यांनी केले. वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्र येथील क्रांतीसिंह पाटील व्यासपीठावरून ते प्रचारसभेत बोलत होते . प्रचार सभेपुर्वी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Advertisement

खास . धैर्यशील माने यांनी सांगितले, हातकणंगले लोकसभा मतदार संघातील 564 गावांपैकी 450 गावात विकासकामे सुरु आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सामान्य कुटुंबातुन उदयास आलेले नेतृत्व आहे . सामान्यांचे अश्रू पुसण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले आहे . माझ्या संसदेतील कामाची व भाषणाची माहीती बघायची असेल तर युट्युबवर लोकसभेतील भाषणे ऐकावीत .

माजी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले , राज्यातील महायुतीच्या नेत्यांनी हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी तरुण, तडफदार व संसदेत अभ्यासुपणे प्रश्न मांडणारा उमेदवार दिला आहे .तरी त्यांना वाळवा, शिराळा तालुक्यातुन भरघोस मतदान देवून विजयी करूया.
प्रचारसभेस जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार , शिवसेनेचे सागर मलगुंडे, रयत क्रांती संघटनेचे सागर खोत, भाजपा तालुका अध्यक्ष निवास पाटील, विक्रम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष केदार भाऊ, शरद पाटील, उपसरपंच सचिन पाटील, रावसाहेब पाटील, विशाल गडदे, संतोष पाटील, गोरखनाथ पाटील, प्रशांत पाटील, आबासो पाटील, सोनू कुलकर्णी, समीर मुल्ला, जयवंत खंडागळे, बबन खंडागळे, सत्यवान शेवाळे,यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement

.