महायुतीचे उमेदवार निलेश राणेंना उस्फूर्तपणे मतदान करावं - संध्या तेर्से
कुडाळ / प्रतिनिधी
आज कुडाळ - मालवण मधील गावागावातून एकच नाव आमदार म्हणून पुढे येत आहे ते निलेश राणे यांचं . विविध विषयांवरील त्यांचा अभ्यास, मतदारसंघात जनसामान्यांची सेवा करायची त्यांची इच्छा आहे. फक्त आमदार म्हणून मिरवण्यासाठी नाही . नारायणराव राणे नेहमी आपल्या भाषणात उल्लेख आवर्जून करतात की मला जी आजपर्यंत मोठी मोठी पद मिळाली त्याचं श्रेय माझ्या मतदारांचं आहे. याच सर्व मतदारांची पुन्हा एकदा त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून सेवा करावी हा एकमेव उद्देश नजरेसमोर ठेवून आज महायुतीचे उमेदवार श्री निलेश राणे आपल्यासमोर उभे आहेत. आपण त्यांना साथ देत या आपल्या कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी सज्ज होऊया. असे आवाहन भाजपाच्या प्रदेश कार्यकारी सदस्या तथा कुडाळ नगरपंचायतीच्या नगरसेविका सौ संध्या प्रसाद तेर्से यांनी केले. आपल्या सर्वांना आपला कुडाळ मालवण मतदारसंघ सक्षम,समृद्ध आणि सर्वार्थाने विकसित बनवायचा असेल तर २० नोव्हेंबर २०२४ रोजी आपला मतदानाचा मुलभूत अधिकार विचारपुर्वक वापरून,आपण मतदान करताना धर्म, राष्ट्र,राज्य या सर्वांसोबत आपल्या पुढच्या पिढीचं उज्वल भवितव्य डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी महायुतीचे उमेदवार निलेश नारायण राणे यांना उस्फूर्त पणे मतदान करावं आणि आपल्या नातलग मित्रमंडळीना आवर्जून सांगावे असे सौ तेर्से म्हणाल्या.
आज महाराष्ट्रात महायुतीची म्हणजे सजक विचारांची ,छत्रपती शिवरायांच्या विचारांवर कार्यरत असणारं सरकार येणं ही काळाची गरज आहे. नुसताच आमदार निवडून द्यायचा नाही तर तुमच्या आमच्या राज्यासाठी एक व्हिजन असणारा व्यक्ती म्हणजे निलेश नारायण राणे यांना आपण सर्वांनी निवडून देणं हे आपलं प्रत्येकाचं एक राष्ट्र कर्तव्य म्हणून आपण यावेळी आवर्जून मतदान करायचं आहे आणि इतरांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे.आज आपल्या कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून श्री राणे हे धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.निलेश राणेच आमदार म्हणून निवडून आले पाहिजेत कारण या मतदारसंघातील रस्ते,पाणी,वीज एवढाच विकास आपल्याला अपेक्षित नसून आज महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या आणि पुन्हा एकदा स्थापन होणार या महायुतीच्या सरकार मधे एक सुशिक्षित,समाजाप्रती तळमळ असणारा आणि एक समृद्ध आणि विकसित मतदारसंघ बनविण्याचे व्हिजन समोर ठेऊन काम करण्याचं ध्येय ठेवणारा आमदार म्हणून श्री निलेश राणे यांना आपण सर्वांनी भरघोस मतांनी निवडून देणं आवश्यक आहे.श्री निलेश राणे मागील तीन वर्ष कुठल्याही संविधानात पदावर नसताना या मतदारसंघातील प्रत्येक गावा गावातील सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात राहून त्यांच्या अडचणी सोडवण्यांच काम अगदी मनापासून करत आहेत. ज्या मतदारसंघात 'नारायणराव राणे यांनी सर्वसामान्य जनतेच्या मनात एक आपुलकीचं, कुटुंबातील व्यक्ती म्हणून स्थान आपल्या कर्तृत्वाने मिळवून हा मतदारसंघ एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला त्याच सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याचं उद्दीष्ट - ध्येय डोळ्यासमोर ठेवून आज श्री निलेश राणे विधानसभेचे उमेदवार म्हणून आपल्यासमोर उभे आहेत. महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघातून पहिल्या ५ सर्वोच्च मताधिक्य मिळवलेल्या आमदारांमध्ये आपला आमदार म्हणून निलेश राणे यांना आपण पाठवून पुढच्या पाच वर्षाच्या आत हा कुडाळ मालवण मतदारसंघ महाराष्ट्रातील एक आदर्श मतदार संघ बनविण्यासाठी त्यांचे हात बळकट करुया. असे सौ तेर्से म्हणाल्या उद्याचा सक्षम, समृद्ध, विकसित महाराष्ट्र बनत असताना आपला हक्काचा आमदार आपण विधीमंडळात पाठवून, आपण राष्ट्र उभारणीत आपलं स्वतःचं भरघोस योगदान मतदानाच्या कर्तव्यातून करावं अशी सर्व मतदार बंधु भगिनींना आग्रहाची विनंती. करते असे सौ तेर्से यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे